Wednesday, May 30, 2007

Food for thought: Larry Ellison says...

Larry Ellison, founder of Oracle, says:

People regularly mistake obedience for intelligence. That's why we think that dogs are more intelligent than cats. We measure intelligence as the speed at which animals learn to do what we want them to do. A dog will fetch a stick every time you throw it. A cat will look at you and wonder, If you wanted the stick, why did you throw it in the first place? Get it yourself, idiot. In reality, cats and dogs have similar intelligence levels but different survival strategies. A dog is dependent and must please to get regular meals. The cat will mooch off his human roommates, but if the food runs out the cat can survive on its own. I love golden retrievers, but I don't want to be one. I'd rather be a cat.

Wednesday, February 14, 2007

फालतू विनोद...

सरदारजी : लॉजिक म्हणजे काय?मित्र : अंऽऽऽ, आता असं बघ, तुझ्याकडे फिश टॅंक आहे ना?सरदार : हो, आहे नामित्र : त्यात मासेसुद्धा असतील ना?सरदार : होमित्र : मग त्या माशांना कोणीतरी खायला घालत असेल ना?सरदार : हो, माझी बायको खायला घालते.मित्र : अरे म्हणजे तुला बायको आहे !सरदार : हो !!!!!!मित्र : म्हणजे तू पुरुष आहेस !!सरदार : हो !!!!!!!!!मित्र : बघ, म्हणजे तुझ्याकडे फिश टॅंक आहे या एका विधानावरून तू पुरुष आहेस असा निष्कर्ष मी काढला. यालाच लॉजिक म्हणतात.सरदार खूश झाला. त्याने लॉजिक म्हणजे काय हे आपल्या बॉसला सांगण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर तो बॉसला म्हणाला :सरदार : बॉस, तुमच्याकडे फिश टॅंक आहे काय?बॉस : नाही रे.सरदार : मग तुम्ही पुरुष नाही !!!!!!!!!!!

--------------------------------------------------------------------------------------------------------
एकदा एक अमेरिकन जोडपं भारतात येतं. त्यांचा इथला पर्यटन मार्गदर्शक एक सरदारजी असतो. सरदारजी त्यांना ताजमहाल दाखवतो आणि सांगतो, "हा महाल बांधायला ४ वर्षं लागली." अमेरिकन जोडपं म्हणतं, "अमेरिकेत हा २ वर्षांत बांधून झाला असता."नंतर सरदारजी त्यांना लाल किल्ला दाखवतो आणि सांगतो," हा किल्ला ३ वर्षांत बांधून झाला." अमेरिकन जोडपं म्हणतं, "अमेरिकेत हा १ वर्षात बांधून झाला असता"हे ऐकून सरदारजी त्यांना धडा शिकवायचं ठरवतो. तो त्यांना कुतुबमिनारापाशी घेऊन जातो. अमेरिकन विचारतात, "हे काय आहे?" सरदारजी म्हणतो, "मला काय माहित? काल तर इथे काहीच नव्हतं !!!!"
-----------------------------------------------------------------------------------------------------------
एकदा संताने फोनला आन्सरिंग मशीन (मराठी शब्द माहित नाही..)बसवले..पण दोनच दिवसात काढावे लागले..बंता आणि त्याच्यासारख्या ४-५ मित्रांकडून मार खावा लगला होता!!त्यांची तक्रार होती.."साला फोन उचलतो आणि स्वतःच सांगतो घरात नाही म्हणून!!
---------------------------------------------------------------------------------------------------------------
एका सरदारजीला जुळी मुले झाली. त्याने नावे ठेवली---टिन् नी मार्टीन्.परत जुळी --P Tor & Repeatorपरत---max & climax परत माञ् जुळी झाल्यावर तो थकला-------Tired & retired!!
--------------------------------------------------------------------------------------------------------------
एकदा एक सरदारजी एका प्रेताचे फोटो काढत असतो.अचानक सर्वजण त्याला मारायला लागतात . क???????.........तो प्रेताला बोलतो ' स्माईल प्लिज'
---------------------------------------------------------------------------------------------------------------
एकदा २ सरदारजी चेस खेळत असतात. अजून २ जण येतात आणि म्हणतात आपण डबल्स खेळू.
बराच वेळ ४ जण खेळतात आणि मग २ जण निघून जातात. उरलेले २ जण पुढे खेळतात.
खूप वेळानी दोघेही कंटाळतात, तेव्हा १ जण म्हणतो: "तुझा फक्त उंट उरला आहे आणि माझा उंट आणि हत्ती. म्हणून मी जिंकलो...
----------------------------------------------------------------------------------------------------------------
2 sardarjis were watching cricket match & Sachin hit a boundary
1st sardar (with exitement) - Oye yaar,aaj Sachin to vadde goal pe goal kar riyah hai!
2nd sardar - Oye gadhe, raha na sardar ka sardar?abe,goal iss mein nahi,cricket mein hota hai!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

One Sardar was enjoying Sun on a Beach in America. A lady came and asked him, "Are you relaxing" Sardar answered, "No. I am Banta Singh" Another guy came and asked the same question. Sardar answered "No, No. Me Banta Singh" Third one came and asked the same question Sardar was totally annoyed and decided to shift his place. While walking he saw another Sardar enjoying on the beach. He went and asked him " Are you relaxing?" The other Sardar was well educated and said, "Yes I am relaxing" Our sardar slapped him on his face and said, "साले, सब तेरे को वहा ढूंढ रहे है और तू यहा आराम कर रहा है?"
------------------------------------------------------------------------------------------------------------
एका सरदारजी म्युझियम मधे गाइड म्हणून काम करत असतो.
सरदारजी: (लोकांना) हा सांगाडा १०,००,००२ वर्षे ३ महीने आणि ७ दिवसांपूर्वीचा आहे.
१ माणुस: तुम्हाला कसे माहीती?
सरदार: मी इथे आलो तेव्हा तो सांगाडा १०,००,००० वर्षे जुना आहे असे मला सांगितले होते...
--------------------------------------------------------------------------------------------------------------
शिक्षक : कोणी मला "राजा राम मोहन रॉय" बद्दल माहिती सांगेल का ?
एक विद्यार्थी : ते चार चांगले मित्र आहेत..
---------------------------------------------------------------------------------------------------------------
एक माणुस दाताच्या डॉक्टरकडे दात काढ

Tuesday, January 30, 2007

Calendar विषयी थोडेसे...

'हा हा' म्हणता January २००७ संपत आला. 'ही: ही:' म्हटले असते किंवा काहीच म्हटले नसते तरीही तो संपतच आला असता, पण असे म्हणायची पद्धत आहे म्हणुन तसे म्हटले. (आणि 'संपत आला असता' म्हणजे 'संपत' नावाचा माणूस नाही, 'महीना संपतच आला असता'...शी: किती पाचकळ विनोद मारतोय मी. अशाने कोणी उरलेला भाग वाचणारच नाही. असो.)

नुकतीच TV वर 'Kingfisher Swimsuit Calendar' ची बातमी पाहिली आणि माझे मन भरुन आले. calendar पाहुन नाही तर 'अशा' प्रकारचे पण calendar असु शकते हे पाहुन. आमच्याकडच्या calendar वर फोटो असलेच तर ते कुठले तरी स्वामी, सदगुरु, जगदगुरु आणि तत्सम मंडळी यांचे असतात. किंवा उरलेली सगळी calendars ही bank, किंवा सहकारी संस्था इत्यादी ची (थोदक्यात म्हणजे 'फुकट' मिळालेली) असतात. ह्या वर्षी 'सुवर्ण सहकारी bank बुडल्यामुळे ते एक calendar नाही मिळाले. खरे तर त्यांची जास्तीत जास्त calendars घेऊन शक्य तितके पैसे वसुल करयचे असे लोकांनी ठरवले होते (तुका म्हणे त्यातल्या त्यात!) पण लोकांच्या पदरी तिथे ही निराशाच आली.

ती bank आमच्या आडनाव बंधूंचीच असल्या मुळे मीही जास्त तीव्र टीका करु शकत नाही . पण माझ्या हितशत्रुंनी मात्र ह्याच फ़यदा घेतला. काही जण नुसतेच 'आगाशे यांचा धिक्कार असो' असे ओरडत माझ्या घरावरुन गेले असे मी ऐकले. असो.

तर आत्ता माझ्या समोर जे calendar आहे त्यात January महिन्यात ३ सदगुरु, २ महर्षी, १ स्वामी, १ नेतजी, २ जगद्गुरु आणि २-३ local level चे महाराज यांच्या जयंत्या/पुयतिथ्या आहेत. आत ह्यातले १ स्वामी (स्वमी विवेकानंद) आणि एक नेताजी (सुभाष चंद्र बोस) सोडले तर बाकिच्यांची power पुणे शहर किंवा जिल्हा पातळीवरच मर्यादीत आहे. पण तरीही ते जगदगुरु आहेत. असो. पण अशा प्रत्येक जिल्ह्यात तिथले local 'जगद्गुरु' असणार. म्हणजे आपल्या देशात ३१ दिवसातले २०-२२ दिवस फक्त 'महापुरुष' जन्माला येतात. किती थोर आपला देश!!

मागे एकदा (आणि बहुतेक ह्या वर्षीही) कुठल्याशा संस्थेने मराठी साहित्यिक/ कवी ह्यांच्या वर एक calendar काढले होते. चांगली कल्पना होती ती. पण तिथे म्हणजे त्या साहित्यिकाचा फक्त फोटो देऊन भागलं नाही. तर त्याचे नाव, तो का 'थोर' आणि 'सुप्रसिद्ध' आहे हे सांगणारा अल्प परिचय (बहुतेकांना त्यांनी काय काय लिहिले आहे ते माहितीच नसते) ही द्यावा लागल. त्या मुळे प्रत्यक्ष calendar ला जागा अपुरी पडु लागली.

सत्पुरुष लोकांच्या बाबतीत हा प्रश्न येत नाही. नावामागे काही तरी विशेषण जोडले की झाले. ते बहुतेक वेळा 'प्रकट' होत असल्याने आणि नंतर 'समाधि' घेत असल्यामुळे जन्म-म्रुत्युची नोंद नसतेच. शिवाय नुसते 'चमत्कार' करणे किंवा 'दैवी प्रसाद' देणे हेच मुख्य आणि एकमेव काम असल्यामुले त्यांनी काय लेखन केले आहे, समाज प्रबोधन केले आहे ह्यासाठी calendar ची जागा अडवली जात नाही. ऎखादा उग्र (आणि अल्प कपड्यातला) फोटो पुरेसा होतो. असलिच थोडीशी जागा तर त्यांचा एखादा पट्ट-शिष्य (जो businessman/ राजकारणी ही असतो) त्याचा फोटो टाकता येतो.

नरेंद्र दाभोळकर ह्यांच्या एका पुस्तकात त्यांनी म्हटले आहे: संत ज्ञानेश्वर, संत तुकराम, रामदास स्वामी ह्यांना मी मानतो. कारण त्यांनी खरोखर अभंग, ओवी ह्यातुन समाज प्रबोधन केले. बाकी काही विचार नाही पटले तरी एक कवी म्हणुन/ साहित्यीक म्हणुन तरी त्यांनी कार्य केले. पन हे हल्लीचे अमुक महाराज (दाभोळकरांनी गजानन महाराज, साइबाबा, अक्कलकोट महाराज इत्यादी ना पण त्यातच जमेस धरले आहे, जे माझ्या मते बरोबर आहे) काहीच करत नाहीत.'

पुर्वीचे नेते पण तुरुंगात गेले तरी लेखन/ चिंतन करायचे. टिळकांनी 'गीतारहस्य', नेहरुंनी 'Discovery of India' etc. हे तुरुंगातच लिहिले. आपले सध्याचे नेते एक तर तुरुंगात जातच नाहीत, आणि गेलेच तरी असे काही लेखन करणे निव्वळ अशक्य! Just imagine की शिबु सोरेन किंवा लालु किंवा सिद्धु तुरुन्गात बसून 'गीता-रहस्य' किंवा तत्सम ग्रंथ लिहित आहेत -:)


/
>पण ह्या calendar च्य बाबतीत एक चांगला प्रयोग म्हणजे, सगळ्या खेळाडुंची चित्रे असलेले calendar तयार करावे. आणि त्यामधे कुठल्याही धार्मिक दिवस, सण, जयंत्या इत्यादी ऐवजी त्या त्या महिन्यातल्या main sports events असे दिले तर किती सुरेख calendar तयार होइल. म्हणजे June-July mahinyaat Wimbledon चे schedule, cricket/ football/ Chess etc. main tournament चे schedule असे दिले आणि वर एकेक खेळाडुचा फोटो (ज्याचा त्या महिन्यात वाढदिवस आहे) असे दिले तर फारच उत्क्रुष्ट calendar तयार होइल.

फक्त प्रश्न असा आहे की बुवा/ महाराज ह्यांच्या 'पुण्याइ' समोर ह्या 'सामान्य' खेळाडुंची power कितिशी उपयोगी पडणार आणि ही calendars कोण विकत घेणार?

~ कौस्तुभ

Wednesday, January 10, 2007

'इच्छुक' उमेदवारांचे (भावी लोक-प्रतिनिधींचे !!??) शक्ती-प्रदर्शन...

ही निवडणुक जिंकलेल्या विजयी उमेदवाराची मिरवणूक नाहिये, ही प्रचार सभेसाठी जमलेली गर्दी पण नाहिये. हे आहे पुणे महानगरपालिकेच्या फ़ेब्रुवारी मधल्या निवडणुकीच्या 'इच्छुक' उमेदवारांचे शक्ती-प्रदर्शन!!!
संपूर्ण निवडणूक प्रचाराला जरी फक्त रु. १ लाख इतकी मर्यादा असली तरी उमेदवरी मिळेपर्यंतच्या खर्चावर काहिही बंधन नाहिये. म्हणुन शक्य तेवढे शक्ती-प्रदर्शन करुन 'पक्षश्रेष्ठींना' आपले 'वजन' अर्थात 'उपद्रवमूल्य' दाखवून द्यायचा हा आटोकाट प्रयत्न...


Congress भवन, पुणे इथे गेले ३-४ दिवस चाललेला असह्य गलका ऐकुन मला तिथे प्रत्यक्ष जाउन फोटो काढावेसे वाटले.
एकेका वॉर्ड मधे अनेक पक्ष, प्रत्येक पक्षात असे अनेक 'इच्छुक' उमेदवार, प्रत्येकाचे असे शक्ती-प्रदर्शन. ह्या सगळ्यात लोकांचा विचार कोण करतोय? खुद्द लोकांना तरी ह्याची लाज, चीड, राग वाटतो का?

आपल्या देशात 'low-breed population' खूप जास्त झाली आहे. असे लोक कि जे ह्या जगातून नाहीसे झाले तरी कोणाचे काही बिघडणार नाही. किंबहुना ते उपकारकच असेल...आणि ह्या लोकांचा जात, धर्म, शिक्षण, व्यवसाय, आर्थिक स्थिती ह्याच्याशी काहिही संबंध नाही. समाज्याच्या सर्व थरात हे 'low-breedpopulation' सापडते. जोवर असले लोक 'vote-bank' च्या रुपानी निवडणुकीतले प्यादे म्हणून आहेत तोवर माझ्या सारख्याच्या मताला (निवडणुकीतले आणि सर्वसाधारण मत) काहिही किंमत नाही.
मग मी मतदान का करायचे? आणि कोणाला? तर मी फक्त माझ्या परीने माझे 'कर्तव्य' म्हणून मतदान केले पाहिजे. मला मतदान हा 'हक्क' नसून 'कर्तव्य' आहे असे वाटते. हक्क म्हटला म्हणजे मी पाहिजे तर तो बजावीन नाही तर नाही...पन कर्तव्य हे केलेच पाहिजे. शिवाय मत देणे ही एकमेव संधी असताना मी ती गमावली तर नंतर मी इतरांना दोष देत बसू शकत नाही.
म्हणूनच ज्या ज्या लोकांना पुणे हे अश्या सामान्य कुवतीच्या लोक-प्रतिनिधींकडे जाउ नये असे वाटत असेल त्यांनी सुशिक्षित आणि जबाबदार माणसालाच मत द्यावे. असा उमेदवार जर दुर्दैवाने नसेल तर अशी छबी असलेल्या पक्षाला तरी किमान मत द्यावे.

आणखी ५ वर्षे अश्या सुमार दर्जाच्या लोकांच्या हातात पुणे महानगरपालिका गेली तर ५ वर्षात, हैद्राबाद, बैंगलोर तर दूरच राहो पण कोचिन, मैसूर आणि त्रिवेंद्रम सारखी छोटी software centres सुद्धा आपल्या पुढे निघून जातील.


~ कौस्तुभ