Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts

Monday, June 7, 2010

Sunday, May 23, 2010

नासाचे अंतराळयान आणि मराठी भाषा



नुकताच मी युनेस्को च्या अहवालानुसार जगातील विविध भाषांची क्रमवारी वाचत होतो...मराठी बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार मराठीचा क्रमांक १६-१७ वा आहे, इटालियन, कोरीअन, पोलीश, डच, स्वीडीश अशा अनेक प्रादेशिक भाषांपेक्षाही वर.

अजून एक interesting गोष्ट मला कळली, ती म्हणजे नासा नी व्हॊएजर नावचं एक यान अंतराळात सोडलं होतं. त्या यानाबरोबर विविध गोष्टी पाठवल्या होत्या - म्हणजे समजा कोणी परग्रहावर माणूस किंवा सजीव प्राणी असलाच तर त्याला आपल्याइथल्या वस्तु, संस्क्रुती, समाज यांची माहिती किंवा तोंडओळख व्हावी यासाठी एक ध्वनीमुद्रिका पाठवली होती. त्यात जगातल्या ५५ प्रमुख भाषांमध्ये एक संदेश होता. ज्यात मराठीचाही समावेश होता. (मराठी संदेश तुम्ही इथे ऐकू शकता)


’नमस्कार, या प्रुथ्वीतील लोक तुम्हाला त्यांचे शुभविचार पाठवतात. आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही या जन्मी धन्य हो’

तो संदेश ऐकून माझा अंगाचा तिळपापड झाला, लाही लाही झाली, चिडचिड, जळजळ, उद्रेक, विस्फोट इ. इ. जे जे शक्य आहे ते सगळं झालं. किती बिनडोक संदेश आहे, काही अर्थच नाही...अशक्य आचरटपणा!

इतके अशुद्ध मराठी उच्चार, भाषा आणि इतका सुमार संदेश. आणि तोही इतक्या ऐतिहासिक आणि खगोलिक (भौगोलिक च्या धर्तीवर हा शब्द मी आत्ताच तयार केला आहे!) अंतराळ यात्रेसाठी. म्हणजे उद्या समजा खरच परग्रहावर कोणी सजीव प्राणी असलाच आणि त्यानी हा मराठी संदेश ऐकला तर त्याचा मराठी भाषेबद्दल किती गैरसमज होईल...पार लाज जाईल आपली. समजा त्यातला एखादा (ह्रितिक रोशनच्या कोई मिल गया मधल्या ’जादू’ सारखा) पुण्यात आला चुकून...आणि ’हीच का तुमची मराठी भाषा’ असं मला विचारलं...तर? तोंड दाखवायला जागा राहणार नाही मला...

अजून एक गंमत म्हणजे, याच संदेशांबरोबर ’Music from Earth’ या शीर्षकाखाली प्रुथ्वीवरचं विविध देशातील संगीताचा समावेश होता (उदा. अमेरिका, मेक्सिको, अझरबैजान, पेरु, ऒस्ट्रेलिया इ.). त्यात भारतीय शास्त्रीय संगीताचा नमूना म्हणून सूरश्री केसरबाई केरकर यांची ’जात कहा हो’ ही साडेतीन मिनिटाची बंदिश ही होती.

ते वाचून मला इतकं नवल वाटलं...की सगळं सोडून त्यांना ’केसरबाई केरकर’ च का सुचाव्यात? म्हणजे माझं केरकर बाईंशी तसं काही वैयक्तिक वाकडं नाही. पण भारतातच ते किती जणांनी ऐकलं असेल काय माहिती, आणि मग परग्रहावरच्या सजीवांना आपल्या संगीताचा हा असा नमूना कशाला? कदाचित ’जात कहा हो’ वगैरे बंदीश त्या सजीवाला अर्थपूर्ण वाटेल असा काहीतरी विचार असावा.

ज्यांनी कोणी हा मराठी संदेश आणि हे भारतीय संगीत निवडले असेल त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांना त्यांचे मौलिक विचार स्पष्ट करायला लावले पाहिजेत!

पण त्यांची तरी काय चूक? हे यान अंतराळात जाऊन तिथे पोचायलाच २५-३० वर्षे लागतात. व्होएजर-१ १९७७ च्या आसपास पाठवले आणि त्याचा प्रवास २०१५ मध्ये पूर्ण होणार आहे. म्हणजे इतके वर्ष जूना संदेश आणि संगीत असलं तर ते आत्ता आऊटडेटेडच वाटणार...विशेषतः मराठी भाषेतला संदेश.

आफ्टरऒल मराठी बरं का, हॆज चेंजड सो म्हणजे सो मच...इन लास्ट २५ ईअर्स...की काही विच्चारू नका!!

~ कौस्तुभ

Saturday, April 24, 2010

साहित्य संमेलन – मला दिसले तसे…




¶मागच्या महिन्यात पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊन आलो तेव्हापासूनच त्याबद्दल लिहायचे होते, लिहायला सुरुवातही केली होती पण काही ना काही कारणामुळे पूर्ण करणे राहून गेले होते...



¶पुण्यात जे काही होते ते अखिल भारतीयच असते. आमच्या घराजवळ ’अखिल भारतीय शनिवार पेठ नवरात्र उत्सव मंडळ’ आहे (त्या नवरात्र मंडळाचा गणपती उत्सव धूमधडाक्यात साजरा होतो! (??) ही अजून एक गंमत). मी साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी गेलो. आधीच्या २ दिवसांचे माहिती नाही पण समारोपाला अमिताभ बच्चन येणार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. मी संध्याकाळी ५:३० च्या सुमारास तिथे पोचलो.



¶पुस्तक प्रदर्शनात जाता जाता वाटेत कवि-संमेलनाच्या ठिकाणी थोडावेळ थांबलो. तिथे श्रोत्यांपेक्षा स्टेजवर कविता साजरी करायला जमलेल्या कवींची गर्दी जास्त होती. निमंत्रितांचे मुख्य कविसंमेलन आधीच होऊन गेले होते. त्यामुळे हे म्हणजे नवीन आणि होतकरु कवींना संधी (किंवा ’उपेक्षितांना संधी’) देण्यासाठी आयोजित केलेले कवीसंमेलन होते. (एवीतेवी मांडव घातलेलाच आहे, त्याचे भाडे द्यावे लागणारच...मग त्यात चार टाळकी आपली (रड)गाणी गात बसले तर बसु दे की...’ - आयोजकांचा ’आतला’ आवाज!)


¶त्यामुळे एकुणच वातावरण मंगल कार्यालयात मुख्य कार्य झाल्यावर मोठ्ठ्या सजवलेल्या खुर्च्या, टेबलं (टेबल या इंग्रजी शब्दाचे हे मराठी अनेकवचन आहे), फुलांच्या माळा इ. भोवती लहान पोरं-टोरं खेळत बसतात ना तसला प्रकार होता. त्याला काहिही नियोजन नाही, समन्वय नाही. मी आत जायचा धोका पत्करला नाही. एकटा ’रसिक’ असा बुभुक्षित कवींच्या कळपाला एकटा सामोरा कसा जाणार? तसेही कवी संभाव्य ’गिऱ्हाईक’ ओळखून त्यांना बेसावधपणे गाठण्यात पटाईत असतात. (अपवाद वकीलांचा...त्यांच्याहून पटाईत कोणीच नसते!), त्यातून हे शिकाऊ (आणि बरेचसे टाकाऊ कवी)...


¶तिथून जवळच दुसऱ्या तंबूत ’परिसंवाद’ चालला होता. (परिसंवाद ह्या विषयावर सविस्तर पुढच्या भागात लिहीणारच आहे...) विषय होता: ’सातासमुद्रापलिकडील मराठी लेखन’. भाग घेणाऱ्या (इंपोर्टेड) साहित्यिकांत ३ अमेरिकेचे होते, एक कॆनडा, एक सौदी अरेबिया आणि एक सिंगापूर! सूत्रसंचालन मात्र पुण्यातल्याच सूत्रसंचालकाकडे होते...काही झाले तरी या ना प्रकारे सगळी ’सूत्रे’ आपल्याकडे ठेवायची हे पुण्यातल्या लोकांना बरोबर जमते. बाकीच्या देशातले मराठी तिथे का नव्हते कुणास ठाऊक? बहुदा लेखक ’सातासमुद्रापलिकडील...’ असा उल्लेख असल्यामुळे (सूत्रसंचालक धरून) सातच माणसे असावीत किंवा त्यांच्याकडे बरोब्बर सातच खुर्च्या असाव्यात. असो.  दुपारी २:३०-३ ची वेळ आणि तंबूतला उकाडा यामुळे आयात केलेल्या पाहुण्याचा मेक-अप उतरायला लागला होता...पण उत्साह मात्र भक्कम होता!


¶ह्या विषयात चर्चा किंवा परिसंवाद करण्यासारखे काय होते मला कळले नाही त्यामुळे ते मुळात एका उंच स्टेजवर चढून, खुर्च्यांमधे अवघडून का बसले आहेत, आणि अत्यंत निरर्थक बडबड का करत आहेत तेच मला कळले नाही. त्यामुळे मी तिथे न रेंगाळता ग्रंथप्रदर्शनाकडे वळलो.


¶ग्रंथप्रदर्शनात ’ग्रंथ’ सोडून इतर गोष्टींचाच भरणा जास्त होता. पुण्यात तसे सतत ग्रंथप्रदर्शन चालूच असते त्यामुळे वेगळे ग्रंथदालन कशासाठी ते कळेना? खूप जास्त स्टॊल आहेत हे वैशिष्ट्य आहे असे मानले तर एक तर सगळ्या स्टॊल मधली पुस्तके बरीचशी सारखीच होती (कारण ते वेगवेगळ्या प्रकाशकांचे स्टॊल नव्हते, तर वेगवेगळ्या वितरकांचे आणि विक्रेत्यांचे स्टॊल होते, बस्स), आणि दुसरे म्हणजे इतके स्टॊल एका जागी असणे हेही काही विशेष नाही. ’अप्पा बळवंत चौक, पुणे’ इथे असे कायम स्वरूपी ग्रंथदालन आहे.


¶सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष ’ग्रंथ’ या विषयात लोकांना जास्त रस नव्हता. एकूणच वेगवेगळ्या स्टॊलवरची गर्दी पाहिली की लगेच माझे म्हणणे पटेल.


¶सगळ्यात जास्त गर्दी अर्थातच खाण्या-पिण्याच्या ठिकाणी होती. पुण्यात कुठही गल्लीबोळात गेलात तरी प्रत्येक खाण्याची जागा धूमधडाक्यात चालत असलेली दिसेल. मग साहित्य संमेलन तरी अपवाद का असावा? साहित्यसंमेलनाला सहकुटुंब आलेले लोक जत्रा, मेळा, सर्कस किंवा नाटक/चित्रपट सारख्या करमणूकीच्या ठिकाणी गेल्या सारखे ५-१० मि. पुस्तके चाळून यथेच्छ भेळ, पाणी-पूरी, सामोसा हादडत होते!


¶सी-डॆक या संस्थेच्या स्टॊलमध्ये त्यांनी ’मराठी’ आणि ’संस्क्रुत’ फॊंटच्या सीडीज ठेवल्या होत्या. तिथली गर्दी पाहून मी लगेच ओळखले की ते सीडीज फुकट वाटत होते! जाता जात एक जोडप्याचे बोलणे कानावर पडले. ’अगं, कशाला आता सीडी? आपल्याकडे कॊम्प्युटर तरी आहे का?’ ’नसला म्हणून काय झालं? मिळतीये सीडी तर घेऊन ठेऊ ना आत्ता...अगदीच काही नाही तर पुढच्या महिन्यात ’अबक’ चा वाढदिवस आहे त्याला देऊ या सीडी भेट...’ (म्हणजे स्टॊल वर फुकट मिळणाऱ्या सीडीज घेऊन पुढच्या महिन्यातल्या वाढदिवसाच्या भेटवस्तुची सोय करायची असे किती दूरदर्शी आणि धोरणी ’साहित्य रसिक’ जमले होते!)


¶त्याखालोखाल गर्दी ज्या ठिकाणी होती तिथे वर काहीच नाव नव्हते त्यामुळे तिथे नक्की काय आहे अशी उत्सुकता वाटून तिथे गेलो. तर तिथे दोन कलावंत रेखाचित्र आणि अर्कचित्र रेखाटत होते. प्रत्येक चित्रासाठी रु. १०० /-  केवळ १०-१५ मि. खरोखच सुंदर अर्कचित्र ते बनवून देत होते...त्यामुळे ते बघायला आणि आपले चित्र काढून घ्यायला बरीच गर्दी जमली होती.


¶सगळ्यात जास्त गर्दीचे जवळपास ३-४ स्टॊल असे ’बिगर-साहित्यिक’ असल्यामुळे एखादा गर्दी असलेला ’साहित्यविषयक’ स्टॊल शोधावा म्हणून मी पुढे गेलो. शेवटी बऱ्यापैकी गर्दी असलेले असे ३-४ स्टॊल मला दिसले. ते अनुक्रमे भविष्य/हस्तरेषा वास्तुशास्त्र (वास्तुयंत्रासकट), ’तुमचे यश तुमच्या हाती, मी यशस्वी होणारच’ छाप सेल्फ-हेल्प पुस्तके, योगचिकित्सा/ आयुर्वेद विषयक, धार्मिक/ पौराणिक, पाकशास्त्र आणि झटपट ___ शिका (इंग्रजी, शेअर बाजार, संगणक इ.) छाप पुस्तकांचे स्टॊल असे होते.


¶थोडी फार गर्दी भाषांतरीत/ रुपांतरीत पुस्तकांसाठी किंवा वादग्रस्त पुस्तकांसाठी होती.

तुरळक गर्दी ’नेहेमीचे यशस्वी लेखक/कवी’ (पुल, वपु, संदीप खरे इ.) यांच्या पुस्तकांभोवती होती.


¶मधे एके ठिकाणी एक सुंदर तरुणी सुंदर आवाजात ’पर्यावरण आणि प्रदूषण’ या विषयावर (किंवा तसेच काही तरी असेल) अतिशय चुकीची माहिती देऊन जनजाग्रुती करत होती, तरीही तिने काही लोकांना (त्यांच्या बायका तिथे येईपर्यंत...) चांगलेच ’खिळवून’ ठेवले होते!


¶बहुतेक लोक अमिताभच्या समारोप समारंभातल्या भाषणासाठी रेंगाळत (तेच तेच पान परत परत वाचत) उभे होते...अचानक लाऊडस्पीकरवर ’आता मी अमिताभ यांना त्यांचे मनोगत व्यक्त करायची विनण्ती करतो’...असे ऐकू आले...आणि फायर आलार्म वाजावा किंवा भूकंप व्हावा तसे सगळे ’रसिक वाचक’ हाततली पुस्तके टाकून अमिताभला बघायला आणि त्याचे (हिंदीमधले) मनोगत ऐकायला पळाले.

¶एकूणच स्वरूप फारच उत्सवी होते...वर्षातले ३ दिवस मिरवणाऱ्या आणि नंतर एकही पुस्तक न वाचणाऱ्या गर्दीबरोबर मी तिथे जाणे ही माझी चूक आहे का ’साहित्य रसिक’ आणि ’संमेलन’ यांच्याकडून काही वेगळे, भरीव घडण्याची अपेक्षा करणे ही माझी चूक तेच मला समजले नाही...तेवढ्यात मला मित्राचा फोन आला - ’अरे आयपीएल मधे मुंबई इंडियन जिंकणार! हरभजन तुफान मारतोय...’


¶करमणूकच करुन घेणे हाच एक हेतू असेल तर अमिताभच्या नाटकी, खोट्या बडबडीपेक्षा (’कसं काय पुणे’ म्हणून पुढे हिंदी भाषण, हिंदी कविता...मराठी साहित्य संमेलनात...आणि अध्यक्षांपासून सगळे माना डोलावणार) मला ’लाईव्ह ऎक्शन’ वाले टी-२० जास्त आवडते...म्हणून मी लगेच घरी परतलो!


¶हे झाले सो-कॊल्ड ’रसिक वाचक’ यांच्या बाबतीतले निरीक्षण...संयोजक/ लेखक आणि एकूणच ’संमेलन’ यां बद्दलचे मत पुढच्या भागात...लवकरच...¶



~ कौस्तुभ

Tuesday, March 16, 2010

वास्तुशास्त्र


सध्या लोकसत्ताच्या वस्तुरंग या पुरवणीत संजय पाटील यांची एक लेखमाला प्रसिद्ध होते. त्याचा विषय ’वास्तुशास्त्र’ हा आहे. मला मुळातच ह्या विषयचा तिटकारा आहे - तो त्यातल्या "शास्त्र" ह्या शब्दामुळे.

माझ्या आठवणीप्रमाणे गेल्या १५-२० वर्षातच हे ’वास्तुशात्र’ चे प्रस्थ माजले आहे, नाही, पद्धतशीरपणे ते माजवले आहे...आणि आपल्याकडची बिनडोक, पापभीरु आणि झटपट सुख मिळवण्याच्या मागे लागलेली आणि कायम लायकीपेक्षा जास्त (पैस, प्रसिद्धी, मान सन्मान इ.) हव्यास असलेली जनता त्याला खतपाणी घालते आहे.


काही दिवसांपूर्वी  "देव्हारा कुठे, कसा"  हा संजय पाटील यांचा (विनोदी) लेख मी वाचला तेव्हाच त्याबद्दल लिहायचे होते - ते काही कारणानी राहून गेले.  नंतर त्यांनी "टॊयलेटचा प्रश्न (भाग १ आणि २)" ह्या शीर्षकाचे अजून २ (विनोदी) लेख लिहीले (नशीब, देव्हाऱ्याच्या लेखासारखे ह्याचे नाव "संडास: कुठे, कसा" असे नाव नाही दिले!

अजून एक निरीक्षण म्हणजे अशा विषयात टॊयलेट हा शब्द जास्त बरा वाटतो, सतत ’संडास’ (हा शब्द) पचायला जास्त जड जाते आणि शौचकूप वगैरे वाचायला जड जाते. इंग्रजी ’टॊयलेट’ बरा!)


ह्याशिवाय पुण्यात जागोजागी ह्या वास्तुतज्ज्ञांचे होर्डिंग्स दिसू लागली अहेत. ’आबा, अप्पा, नाना’ इ. आदरणीय नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे ’पक्या, पप्पु, बबडू, छोटू’ इ. तरूण आणि धडाडीचे कार्यकर्ते यांचे जे अंगावर येणारे प्रचंड फलक असतात - त्याच्या जोडीलाच हे फलक. ह्या फ्लेक्स बोर्ड ची खिल्ली उडवणारा एक फलक पहा:



अजून एक बदल म्हणजे पूर्वी नुसते वास्तु तज्ज्ञ असायचे आणि ते त्यांच्या ’अभ्यासाप्रमाणे’ घराची यथेच्छ तोडफोड करायला लावायचे. म्हणजे घराचे प्रवेशद्वार बरोबर नाही म्हणून असलेला मोठ्ठा दरवाजा बंद करुन ठेवायचा आणि उगाचच खिडकीच्या जागी एक बारीक भोक पाडून त्यातून ये-जा करायची (म्हणजे म्हणे वास्तुदेवता प्रसन्न होते आणि घरात आनंद, सुबत्ता येते!)


हल्लीचे ’व्यावसायिक’ जास्त चतुर आहेत - एक तर ते नुसते वास्तुतज्ज्ञ नसतात - वास्तुविशारद, वास्तु-शिरोमणि, वास्तुमहर्षि, वास्तुमार्तंड अशा पदव्या लावतात (नशीब अजून कोणी स्वतःला ’वास्तुपुरूष’ म्हणवत नाहीत, नाही तर लोक त्यांनाच घरात जिवंत पुरायचे!) आणि हे थोर लोक हल्ली घराची तोडफोड करायला सांगत नाहीत, त्याऐवजी काही (खर्चिक) ’उपाय’/ ’उपचार’ करून ते तीच सुबत्ता, तीच भरभराट मिळवून देऊ शकतात (अर्थातच खर्च तोडफोडी इतकाच होतो, पण मालकाला समाधान हे की आपण भिंती आणि खिडक्या पाडल्या नाहीत)


पुण्यात शास्त्री रोडवर एका वास्तुतज्ज्ञाचे एक होर्डिंग आहे त्याचा USP च मुळी ’विना तोडफोड तुमचे घर, ऒफीस, कारखाना वास्तुशास्त्रानुसार करा आणि सुख, संपत्ती आणि समाधान मिळवा’ असे आहे! त्यांनी ह्यापूर्वीच अशा ३००० हून अधीक संतुष्ट घरांना सुख, संपत्ती आणि समाधान दिले आहे म्हणे. शिवाय त्यांना स्व. राजीव गांधी यांच्या नावाने काही पुरस्कारही मिळाले आहेत. राजीव गांधी, ज्यांनी संगणक युग आणले (किंवा आणण्याचा प्रयत्न केला - ज्याप्रमाणे तुमचे राजकीय विचार असतील त्याप्रमाणे!) त्यांच्या नावाचा ”वास्तुशास्त्रा’साठीचा पुरस्कार हाच एक विनोद आहे.


असो. आता मी परत एकदा संजय पाटील यांच्या (विनोदी) लेखाकडे वळतो:

एक बेसिक न समजणारी गोष्ट म्हणजे, आपली संस्क्रुती ही इतकी थोर आहे की त्यात सगळ्या विषयांवर सगळे संशोधन आधीच झालेले आहे आणि सगळे संस्क्रुत श्लोकांमध्ये लिहूनही ठेवलेले आहे! त्यामुळे कुठल्याही चर्चेला, मुद्द्याला, आरोपाला आधार म्हणजे एखादा संस्क्रुत श्लोक!

मला सांगा - समजा पूर्वी संस्क्रुत हीच व्यवहारातील भाषा असेल तर त्या काळी होणारे कुठलेही लेखन (मग कितीही सामान्य लेखक असेल, किंवा कितीही बेजबाबदार विचार, लिखाण असेल) ते संस्क्रुतमध्येच होत असणार - पण ह्याचा अर्थ असा नाही की ते सगळेच अभ्यासपूर्ण आणि अनुकरणीय असेल. कदाचित त्या काळचे ’वास्तुतज्ज्ञ’ छाप लेखक/कवी असतील - जे तितकेच सुमार आणि अर्थहीन (परंतु संस्क्रुत मध्ये) लिहायचे...


पण संजय पाटील आणि तत्सम स्वघोषित तज्ज्ञ (फक्त ह्याच क्षेत्रातले नाही, तर इतर अनेक विषयातले ज्यात संस्कुत श्लोक आणि ग्रंथ हा त्यांचा आधार असतो) अशा फुटकळ संस्क्रुत श्लोकांचा आधार घेतात आणि त्यांना सोयिस्कर अर्थ काढून ’विकतात’.

आता त्यांच्या लेखातील ही वाक्ये पहा - लेखातली वाक्ये ठळक अक्षरात दिली आहेत, पाहिजे तर तुम्ही मूळ लेख वाचु शकता - माझे विचार साध्या अक्षरात दिले आहेत.

"...देव्हारा आयताक्रुती असावा, असं माझं मत आहे. (नीट लक्षात घ्या - हे त्यांचे वैयक्तीक मत आहे!) त्यासाठी एका श्लोकाचा संदर्भ देतो (म्हणजे मी मघाशी म्हटल्याप्रमाणे संस्क्रुत श्लोकाची ’कुबडी’ वापरली)

"समश्रं समव्रुत्तं यत्पुरुष चेति कथ्यते

आयाताकारधिष्ण्यं वा वनितेति प्रकीर्तितम"

(मानसारम - म्हणजे कुठले काय ते नाही लिहीले)

अर्थात: इमारत जर चौरसाक्रुती अथवा गोलाकार असेल तर ती पुल्लिंगी समजावी आणि आयताक्रुती स्त्रीलिंगी समजावी. पुल्लिंगी इमारतीत स्त्रीलिंगी मूर्ती ठेवू नये मात्र स्त्रीलिंगी इमारतीत स्त्री अथवा पुल्लिंगी मूर्ती ठेवता येते.

इमारतीसाठी असलेला हा नियम घटबिंब प्रतिबिंब द्रुष्टांतानुसार देव्हाऱ्यालाही लागू होतो. (कशावरून? हा सोयिस्कर अर्थ कसा काढला? ह्यात कसले ’शास्त्र’? पण पुढचा विनोदी भाग वाचा, त्यात लगेचच ह्या शंकेचं उत्तर मिळेल)

"...या आयताचं लांबी रूंदीचं प्रमाण १:१:६ असं असावं. आता तुमच्या मनात प्रश्न तयार होईल की हे प्रपोर्शन कसे काय काढलं? हे माझं संशोधन (?) आहे. याला काही गणिती सिद्धांताचा आधार अहे. मी त्याला सच्रेद गेओमेत्र्य (?) असं म्हणतो. आर्किटेक्टस आणि सिव्हिल ईंजिनीअर्सना ते चटकन समजेल. पण बाकीच्यांना ते समजणं कदाचित थोडसं अवघड असल्यानं सध्या त्याबद्दल लिहीत नाही. भविष्यात केव्हातरी लिहीन. "

(मला समजत नाही, हे सोयिस्कर पणे पाहिजे तेव्हा संस्क्रुत श्लोक आणि पाहिजे तेव्हा सायन्स/ ईंजिनिअरिंग याचा आधार कसा घेतात?)

"...देव्हारा मुख्य दरवाज्यासमोर असेल तर द्वारवेध (??) होतो (म्हणजे काय बुवा?) देवाची नजर थेट दरवाज्यावर येणं चांगलं नाही. शिवाय दरवाजात उभं राहिल्यानंतर - वाकून बघितल्यावर नव्हे - देव्हारा दिसणं हा प्रकार वास्तुशास्त्रानं निषिद्ध सांगितलाय"

(कोणते वास्तुशास्त्र??? कोणी लिहीले, आणि अचानक कसे प्रचलित झाले???)"


अशी अनेक उदाहरणे ह्या लेखात आहेत.लोकमान्य टिळकांनी गीतेचा अभ्यास करून ’गीता-रहस्य’ हा ग्रंथ लिहीला. इतरही अनेकांनी प्राचीन भारतीय संस्क्रुतीबद्दल खूप अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. पण त्या अनेक थोर आणि विद्वान व्यक्तींनी कधी ’वास्तुशास्त्र’ किंवा तत्सम विषयावर लिहिल्याचे ऐकीवात नाही. कदाचित ते ग्रंथ त्याकाळी उपलब्ध नसतील आणि अचानकच हल्लीच्या वास्तु-पुरुषांना (लॊटरी लागल्यासारखे!) ते मिळाले असतील.


मला राग ह्याचा आहे की चांगले सुशिक्षेत लोक ही ह्या वाटेला लागतात.

माझा एक मित्र वास्तुशास्त्रानी झपाटला आहे. घरातल्या खोल्या पंचकोनी करण्यापासून ते अनेक लोलक, लंबक, यंत्र टांगून घराचे जंतर-मंतर करण्यापर्यंत सगळे उपाय (विना-तोडफोड किंवा तोडफोडीसहीत!) केल्यावरही त्याला ’अपेक्षित’ सुख मिळेना (म्हणजे महिना ’फक्त’ ८०,००० पगाराच्य ऐवजी त्याला १,२०,००० रु. पगार पाहिजे होता.)

एका नवीन वास्तु-पुरुषाकडे तो गेला. त्यांनी त्याचा हात नीट पाहिला, आणि घरही पाहिले. त्याच्या बोटात नवीन रत्न, अंगठी घालायला एकही जागा रिकामी नाही, तसेच भिंतीवरचा कोणताही कोपरा काहिही टांगायला शिल्लक नाही हे त्या चतुर वास्तु-पुरुषानी ओळखले. त्यामुळे ह्याला काय ’उपाय’ सुचवावा हे त्याला कळले नसेल कदाचित. त्यामुळे त्याने नुसतेच ’निदान’ केले, ’उपाय’ नंतर सांगतो म्हणाला - त्याचे निदान होते, तुमचे शौचालय चुकीच्या ठिकाणी आहे. वास्तुशास्त्रानुसार ते घराच्या मुख्य दरवाज्यापाशी असायला हवे!


आता माझा मित्र घाबरला होता. मला भेटला तेव्हा त्यानी हे सगळे सांगितले. मी गंमतीनी त्याला म्हणालो, "अरे काही तरी सोप्पा उपाय असेलच ना. नाही तर तू असं कर, एक बेडपॆन घे आणि ते तुझ्या मुख्य दरवाज्याच्यावर टांगून ठेव, किंवा फरशी खाली पुरून ठेव - म्हणजे झाले!"

"अरे खरच! हे जमू शकेल, थांब लगेच य़ ना फोन करुन विचारतो!" ही कमाल झाली, म्हणजे मी त्याची टिंगल करायच्या हेतूने बोललो ते पण त्यानी सिरिअसली घेतले!

परत काही दिवसांनी त्याचा फोन आला, की मी सुचवलेला उपाय त्यानी त्या वास्तु-पुरुषाला सांगितला आणि त्याला म्हणे तो ’in-principle’ आवडला.

त्यात थोडे बदल करुन (आणि काही संस्क्रुत श्लोकांचा आधार घेऊन!) तो बाबा आता उपाय सुचवणार आहे!


मी कपाळावर हात मारून घेतला. तेव्हापासून मी अजून त्या मित्राच्या घरी जायचे धाडस केले नाहीये! न जाणो दार उघडताच संडास किंवा संडासाच्या आकाराची खूर्ची समोर ठेवलेली असायची!


~ कौस्तुभ

Tuesday, March 9, 2010

॥ श्री रामरक्षा ॥



माझी रामरक्षा लहानपणापासूनच पाठ आहे...घरातल्या वडिलधारी मंडळींकडून सतत कानावर पडून पडून आपोआपच पाठ झाली, कधी वेगळे पाठांतर करावेच लागले नाही.

लहानपणी केलेल्या पाठांतराचे हे एक वैशिष्ट्य आहे...नकळतच पाठ होते आणि कायमचे लक्षात राहाते (आता काही पाठ करायचे/ नवीन शिकायचे म्हणजे फार मेहेनत करावी लागते)

पण तसेच त्यात एक धोका किंवा दोष पण आहे... तेव्हा जे चुकिचे किंवा सदोष/ अशुद्ध पाठांतर होते ते पण सुधारणे जड जाते. कारण तेव्हा अर्थ वगैरे काही माहितीच नसतो...नुसते कानावर पडते म्हणून लक्षात राहते.

माझे रामरक्षेबाबत तसेच काहीसे झाले आहे. काही जे चुकिचे किंवा अशुद्ध पाठ झाले आहे ते आता मला समजून सुद्धा दुरुस्त करता येत नाही.

म्हणूनच मी रामरक्षा सॉफ्ट कॉपी स्वरूपात शोधत होतो, म्हणजे सतत वाचून काही चुक दुरुस्त करता आली तर बघावे!

सुदैवाने मला नुकतीच ती सॉफ्ट कॉपी मिळाली (अर्थासकट!)...तुम्ही ती इथे डाऊनलोड करू शकता.

लवकरच रामनवमी आहे, तोपर्यंत जर जमले तर चुका सुधारायचा प्रयत्न आहे... बघु जमते का ते

ता. क. - मी रामरक्षा एम पी ३ इथे अपलोड केली आहे...आणि त्याचबरोबर 'मुदाकरात' हे गणपती स्तोत्र (एम पी ३) पण अपलोड केले आहे...

~ कौस्तुभ

Sunday, February 7, 2010

पद्मश्री सैफ अली खान



दरवर्षी प्रमाणे २६ जाने. ला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली, आणि दरवर्षीप्रमाणे त्यावरून वाद सुरु झाले. बरेच लोकांना त्यातली नावे वाचून ’धक्का’ वगैरे बसतो...पण खरं तर त्यात धक्का वगैरे बसण्यासारखे काहीच नाहिये. तुम्ही अगदी सुरुवातीपासूनचे पद्म पुरस्कार पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ह्या पुरस्कारांबद्दल/ ते मिळवणाऱ्यांबद्दल आदर वाटावा असे त्यात काही नाही.

मी खूप आधीपासून पद्म पुरस्कार ’फॊलो’ करतो... तुम्हाला सगळे विजेते पहायचे असतील तर ह्या वेबसाईटला भेट द्या.

आशा भोसले यांना पहिल्या पद्म पुरस्कारासाठी २००८ पर्यंत वाट पहावी लागली - कारकीर्द सुरू होऊन तब्बल ६० वर्षे उलटून गेल्या वर! (तेही थेट ’पद्म विभूषण’, ’पद्मश्री’ आणि ’पद्मविभूषण’ कधी मिळालेच नाही)

मागच्या वर्षी २००९ मध्ये पं ह्रुदयनाथ यांना ’पद्मश्री’ च्या रुपाने पहिला पद्म पुरस्कार मिळाला...आर्टस/ कला ह्या क्षेत्रात...त्याच वर्षी सिनेकलावंत   अक्षयकुमार आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांनाही ’कला’ क्षेत्रासाठी पद्मश्री मिळाली. पं. ह्रुदयनाथ मंगेशकरांनी पहिले गाणे स्वरबद्ध केले ते १९५३-५४ च्या सुमारास, म्हणजे सुमारे ५५-५६ वर्षांपूर्वी (त्यानंतर १५-२० वर्षांनी अक्षयकुमार आणि ऐश्वर्या यांचा जन्म झाला!).

ऐश्वर्या आणि अक्षयकुमार यांनी त्यांची कारकिर्द सुरु केली ती १९९२ च्या सुमारास...पण तरिही पद्मश्री ह्या तिघांनाही एकाच वेळेस - एकाच क्षेत्रासाठी! निदान ऐश्वर्यानी विश्वसुंदरी वगरे किताब (कितीही दिखाऊ असले तरी) मिळवले, अक्षयकुमारचे ’कला’ क्षेत्रात नक्की योगदान काय? आणि ह्रुदयनाथ ह्यांना त्याच दर्जाच्या पुरस्कारासाठी ५० हून अधिक वर्षे वाट पहावी लागते ते का?

त्याचीच पुनराव्रुत्ती ह्या वर्षी झाली. सगळ्यात सुमार, टुकार, लिंबू-टिंबू आणि अशक्त खान - सैफ अली खान - याला २०१० साठीचा पद्मश्री पुरस्कार मिळाला. चित्रपट अभिनेत्री रेखा हिला देखील पद्मश्री दिली आणि उद्योजक आणि समाजकार्यकर्ती अनू आगा यांनापण... रेखा १९६९ मध्ये चित्रपट क्षेत्रात आली, अभिनेत्री म्हणून किंवा इतर कलेच्या द्रुष्टीने तिने फारसे कधी काही केले नाही (जसे हेमामालिनी हिने न्रुत्य क्षेत्रात केले!) तरी तिला ह्या पुरस्कारासाठी ४० वर्षे वाट पहावी लागली.

अनू आगा यांना तर बिझनेस मधील उल्लेखनीय कामगिरीसाठी (थरमॆक्स चा यशस्वी कायापालट केल्याबद्दल) पुरस्कार मिळालाच नाही...पण त्यांनी स्वेच्छानिव्रुत्ती घेऊन सामाजिक क्षेत्रात जे काम केले त्याला २०१० साठीचा पद्मश्री पुरस्कार मिळाला.

त्याउलट सैफ अली खान - ज्याने कुठल्याही उल्लेखनीय चित्रपटात, जो लॆंडमार्क किंवा माईलस्टोन असा मानता येईल - अशा चित्रपटात काम केलेले नाही...तरिही त्याला इतक्या लवकर पद्मश्री पुरस्कार!!?? नाही म्हणायला तो शर्मिला टागोर (जी रवींद्रनाथ टागोरांची नात आहे) आणि पूर्व क्रिकेट कप्तान नवाब पतौडी यांचा मुलगा आहे...ह्या त्याच्या ’कामगिरी’बद्दल पुरस्कार दिला असेल तर असो!

कवी मंगेश पाडगावकर यांनी नुकतीच त्यांना एकही पद्म पुरस्कार न मिळाल्याबद्दल (त्यांच्या हलक्या फुलक्या शैलीत) ’खंत’ बोलून दाखवली. किंवा बाबासाहेब पुरंदरे यांनाही पद्म पुरस्कार न मिळाल्यची खंत ह्रुदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली. पण पद्म पुरस्कार न मिळालेले ते एकटेच नाही, किंवा विनाकारण पद्म मिळालेले ही काही मोजकेच नाहीत.

एकूणच पद्म पुरस्कारांचे विशेष कौतुक किंवा आदर वाटावा असा त्या
ंचा इतिहास नाही...ते थोडेसे आपल्या शिक्षणपद्धतीसारखे आहे...ज्यांना त्याचे तंत्र कळते ते विशेष काही न करताही पुरस्कार (किंवा मार्क्स) मिळवू शकतात आणि ते मिळाले नाही म्हणूनही कोणाचे काही अडत नाही, किंवा ते न मिळालेली माणसे थोर बनतच नाहीत असेही नाही!
---------------------------------------------------------------------------

जाता जाता:
सैफ ला पद्मश्री मिळाल्याचे ऐकल्यावर करिनानेही त्याच्याकडे हट्ट धरला...
’मला ही एक पद्मश्री दे... नाहीतर...’
’अगं, पण ती अशी मिळवता किंवा मागता येत नाही...’
’व्वा! मग तुला कशी मिळाली..’
सैफ चा चेहरा एकदम पडला (त्याच्या पिक्चरसारखाच!)
’बरं बरं...’ आपण एकदम त्याची खपली काढली हे करिनाच्या लक्षात आले
’मग निदान, फिल्मफेअर तरी?’
सैफचा चेहरा एकदम खुलला!
’हं...हे जमण्यासारखे आहे’
’खरंच!!?? कसे जमवणार तू?’ - करिना

’अं...अं...फिल्मफेअर...म्हणजे, शाहरूखशी बोलावे लागेल...अजून त्यानी ह्या वर्षीचे विजेते ठरवले नसले म्हणजे झाले...पण ते तू माझ्यावर सोड...!’

~ कौस्तुभ

Saturday, January 23, 2010

मानद विद्यापीठांची मान्यता… आणि सरकारी अनुदान

नुकतेच शासनानी काही मानद विद्यापीठांची मान्यता रद्द केली. त्यातील काही सुप्रसिद्ध तर आहेतच पण काही राजकीय लोकांशी संबंधित पण आहेत. आपल्याकडच्या (महाराष्ट्रातील) काही विद्यापीठे पण त्यात आहेत. पटकन आठवणारी नावे म्हणजे कोल्हापूर येथील डॊ. डी. वाय. पाटील विश्वविद्यालय आणि पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (टिमवि)

आता हा निर्णय कोणी आणि का घेतला..अचानक घेतला का...किंवा तो चूक की बरोबर ह्यात मला पडायचे नाही. मला एका वेगळ्याच गोष्टीबद्दल लिहायचे आहे.

ह्या बातमीनंतरच २-३ दिवसात अजून एक बातमी सगळ्या प्रसिद्ध व्रुत्तपत्रात प्रसिद्ध झाली, ज्याची फारशी दखल घेतली गेली नाहे असे मला वाटते. आणि ती म्हणजे UGC नी ह्या मान्यता रद्द झालेल्या युनिवर्सिटीला दिलेल्या अनुदानाचा तपशील. मूळ बातमी इथे वाचा:

पुण्यातल्या टिमवि आणि हरिद्वार इथल्या गुरुकुल कांगडी विश्वविद्यालय या दोन अभिमत विश्वविद्यलयांना (ज्यांची मान्यता नुकतीच रद्द झाली) गेल्या ४ वर्षात र. ४७ कोटी इतके सरकारी अनुदान मिळाले!

अधिक तपशील वाचल्यावर लक्षात येते की यातले रु. ४३.७२ कोटी हरिद्वारच्या गुरुद्वार कांगडी विश्वविद्यालयाला मिळाले आणि टिमवि ला फक्त रु. ३.०२ कोटी मिळाले.

बातमीत दिल्या प्रमाणे हरिद्वारचे विश्वविद्यालय ज्योतीष आणि योगाभ्यास यांचे शिक्षण देते. त्यांच्या वेबसाईट वरील माहितीनुसार वेद, प्राच्यविद्या, आयुर्वेद, सायन्स, आर्टस, मॆनेजमेंट, फार्मसी, ईंजिनिअरिंग, लाईफ सायन्सेस, ह्युमॆनिटीज, मेडिकल इ. अनेक शाखांमध्ये शिक्षण दिले जाते. (मुळात ’ज्योतीष’ हा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम म्हणून जिथे शिकवला जातो त्या संस्थेला सरकारी अनुदान देणे चुकीचे आहे असे मला वाटते...पण तो मुद्दा (वादग्रस्त असल्यामुळे) तात्पुरता बाजूला ठेऊ!). या विश्वविद्यालयात सुमारे ४,०२७ विद्यार्थी शिकतात असे ही बातमीत म्हटले आहे.

बातमीत म्हटल्याप्रमाणे टिमवि सोशल सायन्स, हेल्थ सायन्स, जर्नलिझम, ईंजिनिअरिंग, आयुर्वेद, फाईन आर्टस, आर्टस ई. अनेक शाखांमधले अभ्यासक्रम राबवते (ह्यात ज्योतीष येत नाही!) ५,००० हून अधिक विद्यार्थी रेग्युलर कोर्सेस (फुल टाईम) करत आहेत. तर सुमारे ३४,३१२ जण बहिस्थः किंवा अर्ध-वेळ अभ्यासक्रम करत आहेत. थोडक्यात टिमविचा पसारा खूप मोठा आहे!

पुण्यातल्या लोकांना माहिती असेल की टिमवि खूप चांगले काम करत आहे...विशेषतः बहिस्थः, किंवा ज्यांनी काही कारणामुळे शिक्षण अर्धवट सोडलेले होते, किंवा ज्यांना नोकरीबरोबरच पुढचे शिक्षण पूर्ण करावे लागत आहे त्यांच्यासाठी टिमवि एक मोठा आधार आहे. बाकिची कॊलेजेस, युनिव्हर्सिटी हे ज्यात जास्त पैसे कमावता येतील तेच अभ्यासक्रम राबवतात..म्हणजेच शक्यतो पूर्णवेळ. टिमवि चे तसे नाही...शिवाय टिळक या नावाची पत (आणि वलय) या संस्थेनी गेल्या ७० हून अधिक वर्षात कमी होऊ दिलेली नाही...

मला मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे ४७ कोटी अनुदानापैकी टिमविला फक्त रु. ३ कोटीच का मिळाले. (जरी टिमविमुळे जवळ जवळ ४०,००० विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळत आहे) आणि हरिद्वारच्या विश्वविद्यालयाला (जेथे फक्त ४००० जण शिकतात आणि एखाद्या व्यावसायिक संस्थेसारखे तिथे सगळे अभ्यासक्रम राबवले जातात - अगदी ज्योतीषापासून ते सायन्स पर्यंत...) तब्बल रु. ४३ कोटी मिळतात! (म्हणजे टिमविची १४-१५ वर्षांचे अनुदान एकाच वेळेस!)

आता ह्यात अनेक गोष्टी असतील ज्यामुळे हा फरक पडत असेल. उदा. सरकारी ढवळाढवळ नको म्हणून टिमवि (किंवा इतर अनेक संस्था) अनुदान स्वतःहून घेत नसतील किंवा कमीत कमी घेत असतील. दुसरी शक्यता म्हणजे राजकीय लागेबांधे आणि त्यातून जास्तीत जास्त फा

Saturday, December 26, 2009

भारतातील गरीबांची संख्या वाढली – बरे झाले!

सध्या मी ईकॊनॊमिक्स वाचतो आहे...नुकतीच अर्थतज्ज्ञ सुरेश तेंडुलकर यांच्या अहवालावरची एक बातमी वाचली. त्यांनी ’दारिद्र्य रेषेची’ नवी व्याख्या मांडली आहे, आणि त्यानुसार भारतातील ३७% टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली आहे असा निष्कर्ष मांडला आहे.

सध्याची गरिबीची व्याख्या ही १९७३-७४ सालातली आहे. आणि ती उष्मांकावर (Calorie consumption) आधारीत होती (त्यातही शहरातील व्यक्तीला २१०० उष्मांक लागतात आणि खेडवळ व्यक्तीला, नाही चुकलो, ’ग्रामीण’ भागातील व्यक्तीला २४०० उष्मांक प्रतिमहिना असा भेदभाव होता!)

...म्हणजे प्रत्येक भारतीय किती Calories afford करु शकतो ह्या निकषावर आधारीत. त्या पद्धती प्रमाणे भारतातील २७.५% लोक २००४ मध्ये दारिद्र्य रेषेखाली जगत होते. पण ती पद्धत खूपच कालबाह्य झाली होती. मुख्य म्हणजे ती सर्वसमावेशक नव्हती (व्वा! काय भारदस्त शब्द आहे!)

जसा काळ बदलतो तश्या आपल्या गरजा पण बदलतात. कोणे एके काळी ’रोशनी, हवा, पानी’ म्हणजे ’प्रकाश, हवा आणि पाणी’ ह्या सजीवांच्या मुख्य गरजा होत्या. त्यानंतर अर्थातच ’रोटी, कपडा, मकान’ म्हणजे ’अन्न, वस्त्र आणि निवारा’.. पण जगणे म्हणजे फक्त ’जिवंत राहाणे’ नाही...त्यामुळे गरिबीची व्याख्याही फक्त ’जिवंत रहाणे’ याच्याशी निगडीत असू शकत नाही (किंवा पिंपरीत ही!)

पण आपल्या सरकारी व्याख्येप्रमाणे ज्याला अमूक ईतक्या Calories मिळतात तो गरीब नाही आणि ज्याला त्या मिळत नाहीत तो गरीब...इतकी साधी आणि सरळ होती. पण माणसाच्या शिक्षण, आरोग्य, घर/ जमीन, बाकी सामाजिक गरजा (छानछौकी, व्यसने सुद्धा!) ह्यात प्रतिबिंबित होत नाहीत (व्वा! परत एक भारदस्त शब्द...आज काय झाले आहे मला...फारच व्रुत्तपत्रीय परिभाषा वापरतो आहे)

म्हणजे हल्लीच्या काळापुरते बोलायचे तर वर सांगितलेल्या प्राथमिक गरजा थोड्या रुंदावून आता, ’वीज, मोबाईल, ईंटरनेट’ ह्या पण ’जीवनावश्यक गरजा’ होत चालल्या आहेत. कदाचित मनोजकुमार ’रोटी, कपडा और मकान’ चा सिक्वेल बनवेल - ’बिजली, मोबाईल और ईंटरनेट’ नावाचा! असो...

तर तेंडुलकर यांनी आपल्या अहवालात नेमका हाच बदल केला आहे. त्यांनी उष्मांकावर आधारीत गरिबीची व्याख्या बदलून कमीत कमी जीवनावश्यक वस्तूंना लागणारी किंमत ही प्रमाण मानली आहे. त्यानुसार पूर्वी ग्रामीण भागातील लोकांसाठी रु. ३५६ प्रतिमहिना आणि शहरी लोकांसाठी रु. ५३९ प्रतिमहिना ही ’दारिद्र्य रेषा’ होती. आता नवीन व्याख्येप्रमाणे ती ग्रामीण भागासाठी रु. ४४७ आणि शहरी भागासाठी रु. ५७९ ईतकी वाढवण्यात आली आहे.

तुम्हाला कदाचित वाटेल की ही वाढ फारच अल्प आहे...आणि ईतकी व्याख्या बदलून शेवटी ह्या आकड्यात काही फरक पडलाच नाही...पण ते तसे नाही. खालील तक्ता पहा म्हणजे कळेल:

भारतातल्या बहुसंख्य लोकांचे दररोजचे उत्पन्न हे २ डॊलर पेक्षा कमी आहे. रोज १ डोलर पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची संख्या ३५% आहे तर रोज २ डॊलर पेक्षा कमी उत्पन्न असलेले ७९.६% भारतीय आहेत!

म्हणजे केवळ १ डॊलर प्रतिदिन इतका बदल केला तर एकदम ३५ वरून ७९% ईतका मोठ्ठा फरक पडतो...आणि म्हणूनच गरिबीची व्याख्या इतकी महत्वाची आहे. कारण त्यामुळे अनेक कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर किंवा खाली जाऊ शकतात आणि त्यापासून मिळणाऱ्या योजनांपासून वंचित राहू शकतात.

हाच निष्कर्ष तेंडुलकर समितीच्या अहवालावरून सिद्ध होतोय...फक्त गरिबीची व्याख्या थोडी व्यापक करताच भारतातील गरीबांची संख्या २७.५% (२००४ मध्ये) वरुन एक्दम ३७% इतकी वाढली. जवळजवळ १०% म्हणजे तब्बल १० कोटी पेक्षा जास्त!

पण एका अर्थी हा गरिबीच्या व्याख्येतला मूलभूत बदल झाला हे चांगलेच झा
ले...त्यामुळे
ह्यापुढे तरी गरिबीचे खरे चित्र आपल्याला पहायला मिळेल. म्हणूनच मी शीर्षकात म्हणालो होतो - भारतातील गरीबांची संख्या वाढली - बरे झाले!

.............................................

मला वाटते गरिबी हटवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग सरकारसाठी हाच असेल - गरिबीची व्याख्या शिथिल करा... म्हणजे गरिबी रेषा ऎडजस्ट करा...आपोआप गरिबांची संख्या झटक्यात कमी होईल...नशीब अजून कोणा सरकारी अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यात असली योजना अजून आली नाहिये!

~ कौस्तुभ

Monday, December 7, 2009

Sunday, November 29, 2009

सुखांत




आज संजय सूरकर दिग्दर्शित ’सुखांत’ हा इच्छामरण या विषयावरचा मराठी चित्रपट पाहीला...फारच चांगला आणि आशयपूर्ण चित्रपट आहे!


ह्याबद्दल सविस्तर लवकरच...पण शक्य झाल्यास नक्की पहा...चुकवू नका.















~ कौस्तुभ

Tuesday, October 13, 2009

ओबामा, नोबेल, भारतरत्न आणि माध्यमे



ओबामाला २००९ साठीचा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. आणि त्यावर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या ...बऱ्याचश्या टीका/ आक्षेप, काही आनंद व्यक्त करणाऱ्या. बहुतेकांच्या मते हा पुरस्कार ओबामाला देण्यात थोडी घाईच झाली...कदाचित तो त्याच्या आश्वासनांची पूर्ती करतो का ते पाहून अजून काही काळाने हा पुरस्कार देता येऊ शकला असता.



आपल्या वर्तमानपत्रात आणि मिडियामध्ये पण यावर बरीच चर्चा झाली...पण ते फक्त विशिष्ट लोकांपुरतेच मर्यादीत असते...बाकीच्या लोकांना त्याच्याशी फारसे घेणेदेणे नसते.



परवाच आमच्या ओळखिची एक बाई तिच्या दंगा करणाऱ्या ८-९ वर्षाच्या मुलाला समजावून सांगत होती: ’असा दंगा नाही करायचा बाळा, शांत बसलं ना की लोकं शाबासकी देतात, बक्षीस देतात...तो ओबामा बघ...शांत बसल्याबद्दल त्याला केवढा मोठ्ठा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला...मग, बसणार ना शांत आता?’



’बाळा’ नी पूर्ण दुर्लक्ष करून त्याला जे करायचे होते तेच ह्केले...पण मला शांत बसण्याबद्दल हे असे ’incentive’ पाहून गंमत वाटली...



पण कुणी सांगावे, त्या नोबेल कमिटी सुद्धा कदाचित असाच विचार केला असेल...म्हणजे आधीच्या जॊर्ज बुश पेक्षा ओबामा "बराच शांत" आहे...अध्यक्ष होऊन ८-१० महीने झाले तरी अजून एकही नवीन युद्ध सुरु केले नाही...आणि तसे काही करायच्या आतच त्याला नोबेल देऊन टाका...म्हणजे एक जबाबदारी म्हणून तरी तो असे काही करणार नाही!



अन्यथा, ओबामानी असे अजून काहीच केले नाहीये ज्यामुळे त्याचा नोबेल साठी नुसता विचार सुद्धा केला जाऊ शकतो. एक तर नोबेल ला नामांकन द्यायची मुदत ही तो अध्यक्ष झाल्यानंतर केवळ २ महिन्यांनी होती, म्हणजे आत्ताइतके ८-१० महिनेही नाही...केवळ २ महीने. त्यामुळे त्याला नोबेल देणे ह्यात राजकीय विचारच जास्त आहे असे वाटते.



पण आपल्याकडच्या मिडियानी ह्याची दखल घेऊन चर्चा करावी याचे मात्र मला फार आश्चर्य वाटले. नुकतेच मी ’भारतरत्न’ पुरस्कारांवरचे एक चांगले आणि माहितीपूर्ण पुस्तक वाचले. भारतरत्न पुरस्कारातही अनेक वादग्रस्त विजेते आहेत हे बऱ्याच लोकांना माहितीच नसते. आणि आपल्याकडचे विचारवंत, व्रुत्तपत्रे ई. त्यावर कधी बोलताना, टीका करतानाही दिसत नाहीत.



कदाचित ओबामावर टीका करणे सोप्पे असेल कारण त्याचा ह्या टीकाकारांना काही त्रास होणार नाही, आणि ओबामाला तर नाहीच नाहे! पण तेच इथल्या राजकीय पक्षांवर, नेत्यांवर टीका करणे म्हणजे उगाच आपला ’पोटापाण्याचा’ धंदा बंद पडायचा...असा सोप्पा विचार ही मंडळी करत असणार. त्यामुळे कोणी त्या विषयावर जास्त बोलायला धजावत नसेल.



राजीव गांधी, एम. जी. रामचंद्रन या आणि अशा लोकांना जेव्हा भारतरत्न दिले गेले तेव्हा त्याबद्दल चर्चा, वाद व्हायला पाहिजे होते...असे का केले याचे स्पष्टीकरण सरकारला द्यायला भाग पाडायला पाहिजे होते. पण तसे झाले नाही. राजीव गांधी यांना तर ’भारतरत्न’ का दिले हे मला अजून समजलेले नाही. १९८० साली ते (अनिच्छेनीच) राजकारणात आले...१९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येबद्दलच्या सहानुभूतीमुळे पंतप्रधान बनले...लगेच १९८५ साली त्याच सहानुभूतीचा फायदा घेऊन विक्रमी संख्येनी त्यांच

Monday, September 28, 2009

समर्थ रामदास स्वामीं विषयी थोडेसे (बऱ्याच विषयांतरासकट)



नुकतेच मी पुणे मराठी ग्रंथालय इथून समर्थ रामदास यांच्यावरचे एक पुस्तक आणले होते...अचानकच मिळाले आणि जरा चाळल्यावर घ्यावेसे वाटले.

तसा मी ’रामदासी’ नाही...म्हणजे रामदासांचे जास्त काही वाचलेले नाही...त्या मानाने तुकारामांना बरेच follow करतो...

रामदासांचा आणि माझा शेवटचा संबंध हा प्राथमिक शाळेत ’मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा इतकाच मर्यादित होता. माझ्या आयुष्यातले दुसरेवसरे (पहिलेवहिले च्या धर्तीवर) बक्षीस हे ’मनाचे श्लोक’ स्पर्धेतले होते. ज्याबद्दल मला ’रंगीत खडूची पेटी’ बक्षीस मिळाली होती...(ज्यातले रंग ’ढ’ दर्जाचे होते...आमच्या चित्रांसारखे)


पहिले बक्षीस, विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ, ’पाकशास्त्रात’ होते! होय, पाकशास्त्र स्पर्धेत मी ’दडपे पोहे’ बनवायला मदत केली होती...म्हणजे सगळे काम आमच्या ’बाईं’नी च केले होते (हल्ली ह्यांना’टीचर’ म्हणतात म्हणे) मी फक्त त्यात ’रस’ दाखवला - बाकीच्या मुला-मुलींपेक्षा - म्हणून मला बक्षीस मिळाले. अर्थात माझा ’रस’ हा त्यानिमित्तानी पोह्यांची ’चव’ बघायला मिळेल ह्यात जास्त होता...असो. तर हे पहिले बक्षीस म्हणून मला कपडे लावायचा ’हँगर’ मिळाला होता...


म्हणजे स्पर्धा प्रकार, मुलांचे वय, ईयत्ता तुकडी, त्यामागचा ’प्रोत्साहन’ द्यायचा हेतू ह्या सगळ्या-सगळ्याशी संपूर्ण विसंगत असे बक्षीस देण्यात आमची शाळा तरबेज होती...मनाच्या श्लोकाला ’खडूची पेटी’, पाककलेला ’हँगर’, चमचा लिंबूला छोटी स्टीलची वाटी/ वाडगा, तीन पायाच्या शर्यतीला ३ ’भेट द्यायची पाकिटे’ (प्रत्येक पायाला एक ह्या हिशोबानी...पण तीन पायाच्या शर्यतीत दोनच जण भाग घेतात, हे मात्र त्यांच्या लक्षात यायचे नाही)

ही अशी काही तरी बक्षीसे द्यायचे आमची शाळा...म्हणजे त्यानी प्रोत्साहन मिळणे तर दूरच राहो, उलट हसंच जास्त व्हायचे. माझी तर ’हँगर’ ह्या बक्षीसावरून खूपच चेष्टा झाली होती...कारण माझा ’तोळा-मासा’ बांधा बघून (हल्ली असा बांधा बघायला मिळत नाही...हल्ली सगळेच ’अति-सुपोषित’ असतात...) मल ’हँगर’ असे चिडवायचे...जणू काही हँगरला शर्ट अडकवालाय असे वाटायचे म्हणून...आणि त्यात परत हँगरच बक्षीस....असो. पण अशा टीका, टक्के-टोणपे सहन करतच थोर लोकं (उदा: ’स्वतः’) मोठी होतात...मी ’मोठा’ दुसऱ्याच अर्थानी झालो...माझे आत्तचे ’बाळसेदार’ रूप बघता ’हाच का तो हँगर’ असा प्रश्न पडेल...पण कसे का असेना...मीही मोठ्ठा झालो!

असो...हे थोडे (जास्तच) विषयांतर झाले. तर सांगायचा मुद्दा हा की...लहानपणी मनाचे श्लोक किंवा ईतर श्लोक, ओवी, अभंग असे वाचनात यायचे. त्यावरुन बऱ्याच गंमतीजंमती पण व्हायच्या...

म्हणजे - जे का रंजले गांजले च्या ऐवजी ’जे कारंजे गंजले’ असे काही तरी...एकदा संत चोखा मेळा यांच्या ’चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा’ ही ओळ एकाने चुकून गडबडीत ’चोखा म्हणे माझा भाव कमी आहे’ अशी वाचली...आणि मग मास्तर असा हात सैल करायचा ’मणिकांचन योग’ कसा सोडतील...
आमच्या शाळेतले शिक्षक पण ’प्रीपेड’ शिक्षा करायचे...सगळ्यांना नाही...काही निवडक मान्यवरांना, आणि अर्थातच माझा नंबर त्यात फार वरचा होता! म्हणजे शिक्षक वर्गात आले की काही कारण नसताना आम्ही काही मुले दंगा करणारच असे ग्रुहीत धरून ५-५ छड्या मारयचे आणि मग हजेरी घ्यायचे...आमची ’हजेरी’ आधीच झालेली असायची...मग आम्हीसुद्धा मार तर आधीच खाल्ला आहे मग आता दंगा का करु नये? असा विचार करुन खाल्लेल्ल्या माराची भरपाई म्हणून दंगा करायचो. ’कुठल्याही गोष्टीचा पुरेपूर मोबदला मिळाय


Saturday, August 8, 2009

ह्यावर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत

नुकतीच सा रे ग म प ची मेगाफायनल झाली - ह्या वेळच्या पर्वाबाबत निर्णयाची उत्सुकता मला कमी होती...कारण सगळेच professional singers होते. ह्या वेळच्या पर्वाचे मुख्य आकर्षण हे स्पर्धक नसून परिक्षक होते...पण एकूणच त्यांचे ’विवेचन’ आणि ’प्रवचन’ आणि सल्ले ऐकल्यावर त्यापेक्षा देवकी पंडीत बरी असे वाटायला लागले...



गाण्यापेक्षा सुरेश वाडकर आणि ह्रुदयनाथ मंगेशकर यांचा mutual admiration club आणि त्यांच्या आठवणी ह्यावरच जास्त वेळ खर्च झाला - अर्थात त्या आठवणी आणि गाण्याचे मूल्यमापन चांगले असायचे ह्यात शंका नाही...पण हळूहळू त्याचा अतिरेक होतो आहे का अशी शंका यायला लागली होती...



प्रत्येकाची वेगळी तऱ्हा!



ह्रुदयनाथ हे सारखे सारखे फ़्लश बच्क मध्ये जात असतात...ते पण १५-२० वर्षे मागे नाही, एकदम ५०-६० वर्षे मागे - एकदम black and white आठवणी असतात... बर नुसत्या आठवणी असतील तरी ठीक...पण तसे नाही...त्या काही तरी करून ह्यांच्याशी जोडलेल्या असतात...म्हणजे बऱ्याच लोकांनी (कवी, संगीतकार, साहित्यीक ई.) मरण्यापूर्वी शेवटचा फोन त्यांना केलेला असतो. किंवा त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी chorus गायलेला असतो किंव ते recording च्या वेळेस तिथे हजर असतात ई. ई. म्हणजे इकडे गायकाचे गाणे सुरू झाले की तिकडे ते आठवणींचे गाठोडे सोडून बसतात...की आता ह्यावेळेस माझे आणि XYZ चे नाते किती जवळचे होते किंवा माझा ह्या विषयावरचा अभ्यास किती थोर आहे हे सांगतो!



हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये जसे कंपू असतात - तसे मराठीत उघड पणे तरी दिसत नाहीत. पण बारकाईने पाहिले तर तसे ते असावेत असे जाणवते. ह्या पर्वातील बहुतेक गाणी ही मंगेशकर किंवा त्यांचा कंपू ह्यांच्याशी संबंधितच होती - जणू काही ती कार्यक्रमाची मुख्य थीम होती. आणि जेव्हा जेव्हा इतर गाणी सादर झाली तेव्हा परिक्षकांनी (किंवा ह्रुदयनाथ यांनी) त्यांच्या वर जास्त मत देणे टाळले...नुसतेच ’आपण छान गायलात’ वगैरे बोलून विषय संपवला.



सी. रामचंद्र, सुधीर फडके, सुमन कल्याणपूर, जितेंद्र अभिषेकी, श्रीधर फडके यांच्या बद्दल त्यांच्या गाण्याबद्दल बोलयाचे कटाक्षाने टाळले - किंवा इतरांची (शांता शेळके, खळेकाका, लता मंगेशकर ई.ची) जेवढी तोंड भरुन स्तुती केली तितकी बाकिच्यांची केली नाही.



एक तर आठवणींचा मारा किंवा कवितेच्या अर्थाचे ’निरुपण’ असायचे...



ते पाहून मला ’अंदाज अपना अपना’ मधल सीन आठवला. ज्यात तेजा (व्हीलन परेश रावल) आपल भाऊ राम गोपाल बजाज (बिझनेसमन परेश रावल) याला मारायचा (गेम बजाने का) प्लान बनवतो पण चुकून त्याचा मुनीम हरिशंकर मरतो.. ते सांगतान तेजा म्हणतो - ’लेकिन अच्छा हुआ. वो स्साला बहोत धरम करम की बाते करता था...बहोत बोअर करता था वो’ ...परिक्षकांची टिप्पणी ऐकून तसे काहीसे वाटायचे मला :)



मला असे एकदा तरी ऐकायचे होते की - XYZ यांनी मला मरण्यापूर्वी फोने ही केला नाही, किंवा मी ह्या गाण्याशी कुठल्याही प्रकारे संबंधीत नव्हतो (उदा. chorus किंवा recording चा साक्षीदार ई) आणि (तरिही) हे गाणे अतिशय चा

Saturday, July 25, 2009

जीवनसंगीताबद्दल थोडेसे: ’ओ सजना’…आणि मलविसर्जनसुद्धा



आयुर्वेद आणि माझे तसे फारसे सख्य नाही...म्हणजे मला त्याबद्दल वाट्टेल ते ’claim’ करणारे लोक आवडत नाही...आणि विनाकारण इतर उपचार पद्धती वर टीका करणेही आवडत नाही...पण आपल्या so-called भारतीय संस्क्रुती मधलाच हा दोष असावा... अहंमन्यतेनी पछाडले असण्याचा. मग ते हिंदू धर्माच्या बाबतीत असो, किंवा हिंदु संस्क्रुती/ पुराण असो, रामदेव बाबांचे ’योग’ आणि ’प्राणायाम’ असो की, हिंदू मूलतत्ववादी संघटनांचा टोकाचा अभिमान आणि इतरांबद्दलचा आंधळा तिरस्कार/ द्वेष असो...



आपली हजारो वर्षांची परंपरा कशी श्रेष्ठ आहे, सगळे आपल्या पुराणात आधीच कसे लिहून ठेवले आहे आणि सध्या आपण पाश्चात्य संस्क्रुतीचे गुलाम कसे झालो आहोत हे लोकांच्या गळी उतरवण्याचाच सगळा खटाटोप असतो...



तेवढे पुरेसे नाही म्हणून उगाच कशाचा कशाशीही संबंध जोडून नवे ’मार्केट’ तयार करायचे... काही वर्षांपूर्वीपर्यंत अजिबात ऐकीवात नसलेले ’वास्तुशास्त्र’ अचानक ’फार पुरातन’ शास्त्र बनून प्रचलीत होते...त्याला शास्त्रीय आधार काय, आणि ह्या पूर्वी त्याचा विचार का होत नव्हता वगैरे काही नाही... पावसाळ्यात कुत्र्यांच्या छत्र्या कशा अचानक उगवतात तसे अनेक ’स्व-घोषीत’ वास्तुशास्त्र ’उगवतात’...तीच गोष्ट तेजस्वी आणि परिणामकारक असे ’राशींचे खडे’ किंवा ते अमुक यंत्र तमुक यंत्र विकणारे ज्योतीषी.



ह्या सगळ्यात काही प्रामाणीक आणि चांगले प्रयत्नही होत असतात, नाही असे नाही...पण कधी ते लोकांपर्यंत पोचत नाहीत किंवा खूपप्रमाणात पोचतात - इतके की त्याचे पूर्ण व्यावसायीकरण होते आणि मग त्याच्या खऱ्या उद्देशापासून वेगळ्याच गोष्टींना महत्व यायला लागते.



रामदेव बाबांचे योगाभ्यास आणि प्राणायाम यावरचे प्रयत्न आधी (आणि अजुनही काही प्रमाणात) मला चांगले वाटले होते...पण अलीकडे त्यांचा कल उलटसुलट दावे करणे (उदा: दात हे पडल्यानंतर आयुर्वेदाच्या मदतीने परत ’उगवू’ शकतात!) किंवा राजकीय व्यासपीठ, राजकीय भांडणे ह्यात हिंदुत्ववादी संघटनांच्या मागे उभे राहाणे ई. त्या व्यतिरिक्त इतर वाद (योगाभ्यासाचे खासगीकरण आणि व्यावसायीकरण करणे...हाडे/ मांस यांच्या औषधात वापर करणे असे आरोप) ही त्यांनी ओढवून घेतले...पण अजूनही काही प्रमाणात मला त्यांच्या कामाबद्दल आदर आणि उत्सुकता टिकून आहे.



पुण्यातील सकाळ व्रुत्तपत्रसमूह हादेखील पूर्वी खूप प्रतीष्ठीत समूह होता...पण आता तसे म्हणू शकतो का असा प्रश्न पडू शकतो...तीच गोष्ट बालाजी तांबे आणि त्यांच्या आयुर्वेदाच्या प्रयोगाची...त्यांचे (सकाळच्या पुरवणीत येणारे) काही लेख अतिशय चांगले होते, तर बाकीचे प्रचारकी थाटाचे होते.



पण काल सकाळ आणि बालाजी तांबे यांनी संयुक्तपणे जो कार्यक्रम पुण्यात सादर केला त्याच व्रुत्तांत वाचून हसावे का रडावे ते कळेना.. कार्यक्रम होता ’जीवनसंगीत’ ह्या विषयावर...त्यावर आजच्या सकाळ मध्ये आलेल्या बातमीतील हे काही उतारे:




बालाजी तांबे यांनी उलगडले 'जीवनसंगीत



"...ओ सजना बरखा बहार आयी' हे "परख' चित्रपटातील गीत रानडे यांनी गायले. त्यावर भाष्य करताना डॉ. श्री. तांबे म्हणाले, ""या गाण्यात अतिउत्कट इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा परमेश्‍वराच्या मीलनाची आहे. मलविसर्जन तसेच आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे.''




आता हे वाचून मी हसून गडाबडा लोळलो...ह्या गाण्यात ’परमेश्वराच्या मीलनाची उत्कट इच्छा आहे’ हे तांब्यांना कुठुन कळले काय माहिती...साध्या सोप्या प्रेमगीताचा संबंध ओढून-ताणून परमेश्वराशी कशाला? पण हेच आपल्या (वर सांगीतलेल्या) लोकांना कळत नाही...काही तरी करून हिंदू धर्म/ संस्क्रुती/ परंपरा/ ईश्वर ई. शी सगळ्याचा संबंध जोडायचा...आणि त्यापुढील कळस म्हणजे 'मलविसर्जन तसेच आळस दूर करण्यासाठी हे गाणे उपयुक्त आहे.' ...LOL...अशक्य आणि तुडंब हसलो मी...माझ्या डोळ्यापुढे ’हेरा फेरी’ मधला संडासात बसुन ’ओ...नी..ले...गगन के त..ले’ म्हणणारा अक्षयकुमार आला! आणि तशीच आता तांब्यांचे अभ्यासपूर्ण विचार ऐकून लोकं सकाळी घरोघरी ’ओ...सजना...’ गात आहेत असे चित्र उभं राहीलं...




------------------------------------



डॉ. तांबे म्हणाले, ""कार्य, कार्यशक्ती ही शरीरातील सूर्यशक्तीवर आणि पचनाग्नीवर परिणाम करते. ठेका आणि स्वररचना आपल्याला कार्यप्रवृत्त करतो.'' त्याचे प्रत्यंतर रानडे यांनी गायिलेल्या "ऐरणीच्या देवा तुला' या गीतातून आले.



शरीराच्या नाड्या आणि सांधे मोकळे करण्याचा अनुभव "हवा में उडता जाये' या गाण्याच्या श्रवणाने येतो.



तसेच, हृदय हे केवळ रक्ताभिसरणासाठी नाही तर त्याचा उपयोग प्रेमासाठी करावा, या डॉ. तांबे यांच्या वक्तव्याची प्रचिती "निगाहे मिलाने को जी चाहता है' हे गाणे ऐकताना आली. ते म्हणाले, ""दुसऱ्याच्या मनातील ओळखता येते तेव्हा सारासार विवेक करता येतो.



शरीरातील अग्नी संतुलित करण्यासाठी उपयोगी असलेले "दशरथा घे हे पायसदान', रक्तदाब, मधुमेही रुग्णांना शांतरसाची अनुभूती देणाऱ्या "नैनों में बदरा छाये', स्मृतिवर्धन आणि मेंदूचे विकार यावर उपयुक्त असलेले "सिलसिला' चित्रपटातील "जो तुम तोडो पिया' हे मीराबाईचे भजन, हृदयरोगाच्या रुग्णांसाठी उपयुक्त असलेले "वैष्णव जन तो' या भजनावर बेतलेले "किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार' हे गीत ऐकवण्यात आले.

------------------------------------




ऐकावे ते नवलच!



ह्यापूर्वी मिथुनचा अजरामर असा ’गुंडा’ हा चित्रपट पहाताना मला असा निखळ आनंद झाला होता... (गुंडा ह चित्रपत ज्यांनी पाहिला नाही त्यांनी तो आवर्जून पहावा... गूगल व्हीडिओ वर उपलब्ध आहे)



पण गुंडाची गोष्ट वेगळी होती...त्याचा उद्देशच तो होता...पण तांबे आणि सकाळ ह्या नावांशी असला अचरटपणा शोभून दिसत नाही...





s="Apple-style-span" style="font-size:medium;">त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेले मराठीतील सध्याचे आघाडीचे गायक/ वादक यांना मी समजू शकतो...त्यांचा संबंध फक्त गाण्याशी...त्या गाण्याचा तांबे मलविसर्जनाशी जोडतात की, अध्यात्माशी की रक्ताभिसरणाशी की एकूणच जीवनपद्धतीशी, त्या कलावंतांना काय घेणे त्याच्याशी...




पण हे असले कार्यक्रम सकाळ आणि तांबे दोघांबद्दलही शंका निर्माण करणारे आहेत...निदान माझ्यासाठीतरी. (सकाळ तर हल्ली असल्या बाबतीत फारच मोकाट सुटला आहे)

Sunday, May 3, 2009

’शब्दबंबाळ’ मराठी भाषा आणि सावरकर

परवाच ’महराष्ट्र दिन’ झाला (खरे तर सद्यस्थिती पाहाता ’महाराष्ट्र दीन’ असे म्हटले पाहिजे)... त्यानिमित्त ’सकाळ’ मध्ये माधव गाडगीळ यांचा मराठी भाषेबद्दल एक लेख आला आहे. माधव गाडगीळ हे जुन्या काळातील सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ यांचे सुपुत्र - आणि ते स्वतःदेखील शास्त्रज्ञ आहेत. मराठीत साधे आणि सोपे शब्द प्रचलीत करण्यापेक्षा क्लिष्ट आणि दुर्बोध शब्द वापरण्याकडेच तथाकथित विद्वानांचा कल असतो आणि त्यामुळेच मराठी भाषा व्यवहारात मागे पडते आहे - ह्या मुख्य संकल्पनेवर हा लेख आहे.



त्यात दिलेली काही सरकारी भाषेचे (खरं तर ’शासकीय परिभाषा’ असे म्हटले पाहिजे!) ’नमुने’ खरच गमतीदार आहेत. उदा. वनवासी लोकांचे हक्क आणि पुनर्वसन ह्याबद्दलचे हे सरकारी उपकलम पहा:




"बाधिक व्यक्ती व समूह यांच्याकरिता सुरक्षित उपजीविका पुरवण्यासाठी आणि प्रस्तुत विधि व केंद्र सरकारच्या धोरणात दिलेल्या , अशा बाधित व्यक्ती व समूह यांच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी पुनःस्थापना करणे किंवा पर्यायी योजना तयार करणे व संसूचित करणे. प्रस्तावित पुनःस्थापनेसाठी व योजना लेखी स्वरूपात मिळवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील गामसभेची संमती मोफत मिळवणे..." इत्यादी इत्यादी.



मराठी ही माझी मातृभाषा असल्याचा माझा अभिमान हे ’शासकीय मराठी’ वाचून गळून पडला :(



४-४ वेळा त्याच ओळी वाचूनही मला त्याचा अर्थ समजला नाही. असे ’शब्दबंबाळ’ मराठी हे लोक का लिहितात आणि त्यातून काय सिद्ध करायचा त्यांचा प्रयत्न असतो काय माहित?



ते वाचून मला ’मुघल-ए-आझम’ ह्या चित्रपटाची आणि त्यातल्या ’शब्दबंबाळ’ उर्दूची आठवण झाली. नुकताच २-३ वर्षांपूर्वी हा चित्रपट रंगीत स्वरुपात परत प्रदर्शित झाला, तेव्हा माझ्या एका मित्रा बरोबर सीडी वर परत पाहिला. हसून हसून पुरेवाट झाली आमची. डायलॊग तर रिवाईंड कर-करुन ऐकले!



"’शहेजादे-ए-आलम’ का पैगाम ’आवाज-ए-बुलंद’ पढा जाए" असे झिल्ले-ए-इलाही शहेनशाह-ए-आलम महाबली मोहम्मद जलालुद्दिन अकबर म्हणतो (खरं तर किंचाळतो)...म्हणजे थोडक्यात सांगायचे तर ..."सलीम चे पत्र वाच" बस्स, ईतकेच!



त्यात शेवटी एके ठिकाणी सलीम (म्हणजे आपला तेलकट-तूपट चेहेऱ्याचा आणि जास्त तळलेल्या साबुदाणा वड्यासारखा दिसणारा दिलीप कुमार) म्हणतो: "मै अभी अभी शहेनशाह की आखोंमे शोले देख के आ रहा हू" ...त्यावर माझ्या मित्राने त्याचे सामान्यज्ञान पाजळले... "हा चित्रपट रंगीत बनवला ना तेव्हा ही लाईन टाकली बंरं का’... मी: "कशावरून?"  ....तो: "अरे म्हणजे काय...’मुघल-ए-आझम’ १९६० चा...शोले १९७५ चा...मग सलीम तो आधीच कसा पहाणार? आत्ता रंगीत केला तेव्हा शोले येऊन गेला होता..."



बाकी त्यातली सगळीच पात्र विनोदी आहेत. पृथ्विराज कपूर हा त्याचा ’center of gravity’ त्याच्या पोटात असल्यासारखा सतत हलत-डुलत असतो... आणि सुप्रसिद्ध व्हीलन अजीत हा त्यात सलीमचा मित्र आणि एक राजपूत राजा झाला आहे...मला सारखे मध्येच एकदा तरी तो ’रॊबर्ट, व्हेरी स्मार्ट!’ असे म्हणेल अ

Monday, April 13, 2009

Gym आणि फ्यामिली डॊक्टर

नुकतेच आमच्या Gym मध्ये काही महत्वपूर्ण बदल झाले  (मी मराठी माध्यमाचा असल्यामुळे मी आधी ’व्यायाम शाळा’ असे म्हणायचो. ते ऐकून लोक नाकं मुरडायचे. ’Gym’ कसं त्यांना ’sophisticated’ वाटते. म्हणजे जागा तीच. फक्त नाव बदललं की एकदम त्याचा ’क्लास’ बदलतो. असो.)



आधी लेडीज Gym च्या वेळा (Gym च्या वेळा ...काय रचना आहे... ’गाड्यांना खूप गर्द्या होत्या’ सारखे) वेगळ्या होत्या (दुपारी १२ ते ५), पण आता असे काही वेगळे टायमिंग  नाहि. लेडीज आणि जेंट्स - सगळ्यांचे टायमिंग एकच!



आता असे झाल्यामुळे एकदम बरेच बदल घडून आले. काही जणं यायचेच बंद झाले, तर काही जणं एकदम ’रेग्युलर’ यायला लागले (तेही १ च्या ऐवजी २ तास!)



माझी मात्र पंचाईत झाली. सध्याची वेळ बदलणे मला शक्य नाही, आणि आहे त्याच वेळेस जायचे म्हणजे ... आता बघा...Gym ला  जाऊन २.५ किलो. आणि ३ किलो. वजन उचलणं बरं दिसतं का? ते ही अशा ’लेडीज बायकांच्या’ समोर - ज्या ३०-४० किलो वजन सहज उचलतात!



म्हणून मी पण ठरवलं - आपण ५० किलो वजन उचलायचं!



पण माझा आगाऊपणा नडला आणि शेवटी व्ह्यायचे तेच झाले. माझ्या पाठीत उसण भरली...



१-२ दिवस तसेच काढले. पण शेवटी नाईलाजाने मी आमच्या फ्यामिली डॊक्टर कडे जायचे ठरवले (नाईलाजाने का ते कळेलच लवकरच)...



आमचे डॊक्टर थोडे ’वेगळे’ आहेत, आमच्या सारखेच. (’विचित्र’ म्हणणे बरं दिसत नाही)



"आनंद" मधला अमिताभ अजून थोडा किडकिडीत असता आणि त्याला जाड चश्मा आणि टक्कल असते तर जसा दिसला असता ना तसे दिसतात आमचे डॊक्टर....(म्हणजे नक्की कसे...असा फार ताण देऊ नका डोक्याला)



ते एकदम हळू आवाजात बोलतात आणि प्रचंड भरभर बोलतात.  इतके की ते ऐकुन त्याचा डोक्यात अर्थ लावून त्यावर प्रतिक्रिया देइ पर्यन्त त्यांची २-३ वाक्ये झालेली असतात.



माझा तर नेहेमी ते तपासत असताना गोंधळ होतो...’श्वास घ्या. सोडा, घ्या. सोडा, घ्या.सोडा’ असे इतक्या भरभर करायला लावतात की एकदा मी वैतागून त्यांना म्हटले: "अहो आताच तर सोडला श्वास, पुन्ह सोडा काय. आधी घेऊ तर दे, मग सोडतो"



पण तसे ते चांगले आहेत (म्हणजे स्वस्त आणि मस्त!). कुणालाही कसलाही आजार झाला असेल तरी ते ’हे अपचनामुळे होत आहे’ असे निदान करतात...कारण त्यावरचे औषध त्यांना खात्रीने देता येते.



एकद माझ्या डोक्याला टेंगूळ आले होते,  त्याचे निदान पण त्यांनी, ’हे अपचनामुळे झाले आहे’ असे केले...आता बोला...



पण एक मात्र खरे...त्यांच्या नेहेमीच्याच हिरव्या, लाल, पिवळ्या गोळ्यांना गूण मात्र चांगला आहे...


le
="font-size:medium;">

असो. थोडक्यात सांगायचे तर, डॊक्टरांच्या एका ’डोस’ नी माझी पाठ एकदम बरी झाली. त्यामुळे आता मी नव्या जोमाने Gym पुन्हा सुरु करायला सज्ज झालो आहे!!!


Wednesday, March 11, 2009

दिवस फार कठीण आहेत...




नुकतेच आमच्या एका प्रोजेक्ट मीटिंग मध्ये मी माझ्या manager ला सांगितले: ’माझ्या टीम मधला एक जण resign करणार आहे अशी कुणकुण मला लागली आहे’ (अर्थात हे मी इंग्लिश मध्ये सांगितले - आत इंग्लिशमध्ये मी ’कुणकुण लागली आहे’ हे कसे म्हटले असले प्रश्न विचारु नका. भावना लक्षात घ्या! तर कुठे होतो मी - हा,  कुणकुण लागली...)



तर माझा manager म्हणाला ’अरे खरंच जात असेल ना तर जाऊ दे त्याला’... म्हणजे एखादा मुलगा बागेत गेल्यावर ’मला झोपाळ्यावर जायचे’ असा हट्ट करु लागल्यावर जसे आपण म्हणतो ना - ’जा हो बाळा, नाही तुला कोणी अडवणार’ तसे मी त्याला रेसिग्न करणाऱ्याला म्हणणे अपेक्षित होते की काय... (आता खरं तर हे उदाहरण तितकेसे योग्य नाही. इतक्या समजूतदारपणे कोणीही आपल्या ’कार्ट्या’शी बोलत नाही. पण (परत एकदा) - भावना लक्षात घ्या!)



आता अगदी खरे सांगायचे तर असे कोणीही माझ्याजवळ बोलले नव्हते. मीच जरा चाचपणी करावी म्हणून एक खडा मारून पाहिला - म्हणजे उद्या मीच असे म्हणालो तर त्याचा कितपत फायदा होईल ह्याची चाचपणी करण्यासाठी. पण ’जातोय तर जाऊ दे’ हे ऐकून मला एकदम धक्काच बसला. (माझाच ’खडा’ मला बूमरॆंग सारखा येऊन लागला) असो. थोडक्यात काय सध्या आहे त्या जॊबशी ’एकनिष्ठ’ राहाणे चांगले!



पण सध्या काही काम पण नाहीये, आणि त्यामुळे दिवस कसा घालवावा ते कळत नाही. हल्ली तर ईमेल्स येणे ही बंद झाले आहे. म्हणून मग टाईम पास म्हणून मीच इतरांना पाठवलेले ईमेल्स ’सेन्ट आयटम्स’ फोल्डर मध्ये जाऊन वाचतो.



पण असे तरी किती दिवस करणार? म्हणून मग मी आणखी एक युक्ती शोधली. आमच्या इथे वेब ईमेल्स (याहू, जी मेल, हॊटमेल इत्यादी) ब्लॊक केले आहेत. फक्त लायब्ररी मध्ये ओपन होते. म्हणून मग मी स्वतःलाच माझ्या याहू, होटमेल, जी मेल वर ईमेल करतो. आणी मग लायब्ररी मध्ये जाऊन त्या वाचतो..आणि मग त्याला माझा ऒफीसच्या ईमेल वर रीप्लाय करतो...आणि मग माझ्या डेस्क वर येऊन ते रीप्लाय वाचतो. हे सगळे करता करता वेळ कसा जातो ते कळतच नाही!



आता तुमच्या लक्षात आले असेल कि मी किती पडीक आहे. पण हा असा टाईम पास तरी किती दिवस करणार? लवकरच काही तरी नवीन विरंगुळा शोधला पाहिजे.



जी गोष्ट ईमेल्स ची तीच फोन ची. हल्ली कुणाचे फोनच येत नाहीत. अगदी क्रेडिट कार्ड किंवा इन्व्हेस्टमेंट स्कीम विकणारे फोन ही नाहीत. पण चुकून असा फोन आलाच तर मग मात्र मग मी ती संधी सोडत नाही. अगदी अर्धा पाऊण तास तरी बोलून सगळी माहिती मिळवतो. तेवढाच वेळ जातो, आणि इतरांना मी बिझी असल्यासारखे वाटते.



असो...आता मी जातो, परत एक ’महत्वाचा’ फोन आला आहे. क्रुषी महाविद्यालयाच्या एका प्रदर्शनात एका स्टॊल मध्ये मी जाऊन एका आधुनिक कीटकनाशक फवारणी यंत्राबद्दल मी उत्सुकता दाखवली होती...आणि अधिक माहिती साठी माझा फोन नंबर दिला होता...त्याच बाबाचा फोन आहे!  आता चांगला तासभर तरी मी त्याला सोडत नाही  -:)

Tuesday, January 30, 2007

Calendar विषयी थोडेसे...

'हा हा' म्हणता January २००७ संपत आला. 'ही: ही:' म्हटले असते किंवा काहीच म्हटले नसते तरीही तो संपतच आला असता, पण असे म्हणायची पद्धत आहे म्हणुन तसे म्हटले. (आणि 'संपत आला असता' म्हणजे 'संपत' नावाचा माणूस नाही, 'महीना संपतच आला असता'...शी: किती पाचकळ विनोद मारतोय मी. अशाने कोणी उरलेला भाग वाचणारच नाही. असो.)

नुकतीच TV वर 'Kingfisher Swimsuit Calendar' ची बातमी पाहिली आणि माझे मन भरुन आले. calendar पाहुन नाही तर 'अशा' प्रकारचे पण calendar असु शकते हे पाहुन. आमच्याकडच्या calendar वर फोटो असलेच तर ते कुठले तरी स्वामी, सदगुरु, जगदगुरु आणि तत्सम मंडळी यांचे असतात. किंवा उरलेली सगळी calendars ही bank, किंवा सहकारी संस्था इत्यादी ची (थोदक्यात म्हणजे 'फुकट' मिळालेली) असतात. ह्या वर्षी 'सुवर्ण सहकारी bank बुडल्यामुळे ते एक calendar नाही मिळाले. खरे तर त्यांची जास्तीत जास्त calendars घेऊन शक्य तितके पैसे वसुल करयचे असे लोकांनी ठरवले होते (तुका म्हणे त्यातल्या त्यात!) पण लोकांच्या पदरी तिथे ही निराशाच आली.

ती bank आमच्या आडनाव बंधूंचीच असल्या मुळे मीही जास्त तीव्र टीका करु शकत नाही . पण माझ्या हितशत्रुंनी मात्र ह्याच फ़यदा घेतला. काही जण नुसतेच 'आगाशे यांचा धिक्कार असो' असे ओरडत माझ्या घरावरुन गेले असे मी ऐकले. असो.

तर आत्ता माझ्या समोर जे calendar आहे त्यात January महिन्यात ३ सदगुरु, २ महर्षी, १ स्वामी, १ नेतजी, २ जगद्गुरु आणि २-३ local level चे महाराज यांच्या जयंत्या/पुयतिथ्या आहेत. आत ह्यातले १ स्वामी (स्वमी विवेकानंद) आणि एक नेताजी (सुभाष चंद्र बोस) सोडले तर बाकिच्यांची power पुणे शहर किंवा जिल्हा पातळीवरच मर्यादीत आहे. पण तरीही ते जगदगुरु आहेत. असो. पण अशा प्रत्येक जिल्ह्यात तिथले local 'जगद्गुरु' असणार. म्हणजे आपल्या देशात ३१ दिवसातले २०-२२ दिवस फक्त 'महापुरुष' जन्माला येतात. किती थोर आपला देश!!

मागे एकदा (आणि बहुतेक ह्या वर्षीही) कुठल्याशा संस्थेने मराठी साहित्यिक/ कवी ह्यांच्या वर एक calendar काढले होते. चांगली कल्पना होती ती. पण तिथे म्हणजे त्या साहित्यिकाचा फक्त फोटो देऊन भागलं नाही. तर त्याचे नाव, तो का 'थोर' आणि 'सुप्रसिद्ध' आहे हे सांगणारा अल्प परिचय (बहुतेकांना त्यांनी काय काय लिहिले आहे ते माहितीच नसते) ही द्यावा लागल. त्या मुळे प्रत्यक्ष calendar ला जागा अपुरी पडु लागली.

सत्पुरुष लोकांच्या बाबतीत हा प्रश्न येत नाही. नावामागे काही तरी विशेषण जोडले की झाले. ते बहुतेक वेळा 'प्रकट' होत असल्याने आणि नंतर 'समाधि' घेत असल्यामुळे जन्म-म्रुत्युची नोंद नसतेच. शिवाय नुसते 'चमत्कार' करणे किंवा 'दैवी प्रसाद' देणे हेच मुख्य आणि एकमेव काम असल्यामुले त्यांनी काय लेखन केले आहे, समाज प्रबोधन केले आहे ह्यासाठी calendar ची जागा अडवली जात नाही. ऎखादा उग्र (आणि अल्प कपड्यातला) फोटो पुरेसा होतो. असलिच थोडीशी जागा तर त्यांचा एखादा पट्ट-शिष्य (जो businessman/ राजकारणी ही असतो) त्याचा फोटो टाकता येतो.

नरेंद्र दाभोळकर ह्यांच्या एका पुस्तकात त्यांनी म्हटले आहे: संत ज्ञानेश्वर, संत तुकराम, रामदास स्वामी ह्यांना मी मानतो. कारण त्यांनी खरोखर अभंग, ओवी ह्यातुन समाज प्रबोधन केले. बाकी काही विचार नाही पटले तरी एक कवी म्हणुन/ साहित्यीक म्हणुन तरी त्यांनी कार्य केले. पन हे हल्लीचे अमुक महाराज (दाभोळकरांनी गजानन महाराज, साइबाबा, अक्कलकोट महाराज इत्यादी ना पण त्यातच जमेस धरले आहे, जे माझ्या मते बरोबर आहे) काहीच करत नाहीत.'

पुर्वीचे नेते पण तुरुंगात गेले तरी लेखन/ चिंतन करायचे. टिळकांनी 'गीतारहस्य', नेहरुंनी 'Discovery of India' etc. हे तुरुंगातच लिहिले. आपले सध्याचे नेते एक तर तुरुंगात जातच नाहीत, आणि गेलेच तरी असे काही लेखन करणे निव्वळ अशक्य! Just imagine की शिबु सोरेन किंवा लालु किंवा सिद्धु तुरुन्गात बसून 'गीता-रहस्य' किंवा तत्सम ग्रंथ लिहित आहेत -:)


/
>पण ह्या calendar च्य बाबतीत एक चांगला प्रयोग म्हणजे, सगळ्या खेळाडुंची चित्रे असलेले calendar तयार करावे. आणि त्यामधे कुठल्याही धार्मिक दिवस, सण, जयंत्या इत्यादी ऐवजी त्या त्या महिन्यातल्या main sports events असे दिले तर किती सुरेख calendar तयार होइल. म्हणजे June-July mahinyaat Wimbledon चे schedule, cricket/ football/ Chess etc. main tournament चे schedule असे दिले आणि वर एकेक खेळाडुचा फोटो (ज्याचा त्या महिन्यात वाढदिवस आहे) असे दिले तर फारच उत्क्रुष्ट calendar तयार होइल.

फक्त प्रश्न असा आहे की बुवा/ महाराज ह्यांच्या 'पुण्याइ' समोर ह्या 'सामान्य' खेळाडुंची power कितिशी उपयोगी पडणार आणि ही calendars कोण विकत घेणार?

~ कौस्तुभ

Wednesday, January 10, 2007

'इच्छुक' उमेदवारांचे (भावी लोक-प्रतिनिधींचे !!??) शक्ती-प्रदर्शन...

ही निवडणुक जिंकलेल्या विजयी उमेदवाराची मिरवणूक नाहिये, ही प्रचार सभेसाठी जमलेली गर्दी पण नाहिये. हे आहे पुणे महानगरपालिकेच्या फ़ेब्रुवारी मधल्या निवडणुकीच्या 'इच्छुक' उमेदवारांचे शक्ती-प्रदर्शन!!!
संपूर्ण निवडणूक प्रचाराला जरी फक्त रु. १ लाख इतकी मर्यादा असली तरी उमेदवरी मिळेपर्यंतच्या खर्चावर काहिही बंधन नाहिये. म्हणुन शक्य तेवढे शक्ती-प्रदर्शन करुन 'पक्षश्रेष्ठींना' आपले 'वजन' अर्थात 'उपद्रवमूल्य' दाखवून द्यायचा हा आटोकाट प्रयत्न...


Congress भवन, पुणे इथे गेले ३-४ दिवस चाललेला असह्य गलका ऐकुन मला तिथे प्रत्यक्ष जाउन फोटो काढावेसे वाटले.
एकेका वॉर्ड मधे अनेक पक्ष, प्रत्येक पक्षात असे अनेक 'इच्छुक' उमेदवार, प्रत्येकाचे असे शक्ती-प्रदर्शन. ह्या सगळ्यात लोकांचा विचार कोण करतोय? खुद्द लोकांना तरी ह्याची लाज, चीड, राग वाटतो का?

आपल्या देशात 'low-breed population' खूप जास्त झाली आहे. असे लोक कि जे ह्या जगातून नाहीसे झाले तरी कोणाचे काही बिघडणार नाही. किंबहुना ते उपकारकच असेल...आणि ह्या लोकांचा जात, धर्म, शिक्षण, व्यवसाय, आर्थिक स्थिती ह्याच्याशी काहिही संबंध नाही. समाज्याच्या सर्व थरात हे 'low-breedpopulation' सापडते. जोवर असले लोक 'vote-bank' च्या रुपानी निवडणुकीतले प्यादे म्हणून आहेत तोवर माझ्या सारख्याच्या मताला (निवडणुकीतले आणि सर्वसाधारण मत) काहिही किंमत नाही.
मग मी मतदान का करायचे? आणि कोणाला? तर मी फक्त माझ्या परीने माझे 'कर्तव्य' म्हणून मतदान केले पाहिजे. मला मतदान हा 'हक्क' नसून 'कर्तव्य' आहे असे वाटते. हक्क म्हटला म्हणजे मी पाहिजे तर तो बजावीन नाही तर नाही...पन कर्तव्य हे केलेच पाहिजे. शिवाय मत देणे ही एकमेव संधी असताना मी ती गमावली तर नंतर मी इतरांना दोष देत बसू शकत नाही.
म्हणूनच ज्या ज्या लोकांना पुणे हे अश्या सामान्य कुवतीच्या लोक-प्रतिनिधींकडे जाउ नये असे वाटत असेल त्यांनी सुशिक्षित आणि जबाबदार माणसालाच मत द्यावे. असा उमेदवार जर दुर्दैवाने नसेल तर अशी छबी असलेल्या पक्षाला तरी किमान मत द्यावे.

आणखी ५ वर्षे अश्या सुमार दर्जाच्या लोकांच्या हातात पुणे महानगरपालिका गेली तर ५ वर्षात, हैद्राबाद, बैंगलोर तर दूरच राहो पण कोचिन, मैसूर आणि त्रिवेंद्रम सारखी छोटी software centres सुद्धा आपल्या पुढे निघून जातील.


~ कौस्तुभ