Wednesday, August 18, 2010

मराठी मोजमापे…

धान्य मोजण्याची मापं :



दोन नेळवी = एक कोळवे

दोन कोळवी = एक चिपटे

दोन चिपटी = एक मापटे

दोन मापटी = एक शेर

दोन शेर = एक अडशिरी

दोन अडशिर्‍या = एक पायली

सोळा पायल्या = एक मण

वीस मण = एक खंडी

चार शेर= एक पायली

आठ पायली= एक कुडव

आठ कुडव= एक गिध

वीस कुडव= एक खंडी.

एक शेर म्हणजे जवळपास ८५० ग्रॅम. एक पायली म्हणजे ४.५ कीलोला थोडे कमी भरते.


सोने-चांदी-औषध मोजण्याची मापं :

गुंज तुम्हाला माहीतच असेल. नसेल तर इथे पहा : गुंज

आठ गुंजा = एक मासा

बारा मासे = एक तोळा


अंक :

१ - एक

१० - दहा

१०० - शंभर

१००० - हजार

१०००० - दहा हजार

१००००० - लक्ष

१०००००० - दशलक्ष

१००००००० - कोटी

१०००००००० - दशकोटी

१००००००००० - अब्ज

१०००००००००० - खर्व

१००००००००००० - निखर्व

१०००००००००००० - महापद्म

१००००००००००००० - शंकू

१०००००००००००००० - जलधी

१००००००००००००००० - अन्त्य

१०००००००००००००००० - मध्य

१००००००००००००००००० - परार्ध


चलन :

तीन पै = एक पैसा

दोन पैसे = एक ढब्बू पैसा

दोन ढब्बू पैसे = एक आणा

दोन आणे = एक चवली

दोन चवल्या = एक पावली

दोन पावल्या = एक अधेली

दोन अधेल्या = एक रुपया


अंतर :

तीन फूट = एक यार्ड

१७६० यार्ड = एक मैल

दोन मैल = एक कोस

1 comment:

  1. सोळा पायल्या = एक मण आणि वीस मण = एक खंडी
    म्हणजे एक खंडी =३२० पायल्या

    आणि

    आठ पायली= एक कुडव, वीस कुडव= एक खंडी.
    म्हणजे एक खंडी = १६० पायल्या

    हे कसे?
    काही चुकले आहे का?

    ReplyDelete