Thursday, May 14, 2009

"झाड": एक कविता


कविता आणि मी - हे समीकरण फारसं कधी जुळंल नाही (कविता म्हणजे - काव्य...कविता नावाचा इतर कुठलाही पदार्थ आमच्या अवतीभवती नाही)...तर मी कवितेत फारसा रमलो नाही कारण मला त्यातले फारसे कधी कळलेच नाही...  (’आपल्याला एखाद्या गोष्टीतले कळंत नाही’ हेच बऱ्याच लोकांना कळंत नाही...मला ते कळते आणि ते मी मान्य करतो हे काय कमी आहे?). 

आमचे मास्तर, किंवा काही कविता कळते असे समजणारे लोक एकाच कवितेतून नाही नाही ते अर्थ काढतात - की जे खुद्द कविलापण अभिप्रेत नसतील. 

"Censor is a person who finds 3 meanings of a joke - when there are actually only 2!" ... तसे काहीसे....असो.

पण तरीही मी कविता वाचत राहतो - कधी तरी मलाही कविता कळेल (निदान एक अर्थ तरी!) ह्या सद्भावनेने.

आणि परवाच एक अशी कविता वाचण्यात आली जी मला चक्क कळली! (मी जर मराठीचा प्राध्यापक असतो तर ’कविता भावली’ असे म्हणालो असतो, आणि स्वतः कवी असतो तर ’कविता उमगली’ असे!)

कविता कळली त्याचे कारण ति ज्या विषयावर आहे त्या मंदीचा फटका मलाही बसला आहे... (आमच्या एका नातेवाईकाचे नाव ’मंदा’ आहे - तिला लाडानी लोक ’मंदी’ म्हणतात...आणि ती लाडानी आम्हाला कायम फटके द्यायची...पण ते ’मंदीचे फटके’ वेगळे...)

तर ती कविता कोण्या एका ’स्वामी’ नावाच्या कवीची आहे...आता स्वामी हे त्याचे (किंवा तीचे) "टोपणनाव" आहे, की "रिफील-नाव" की "संपूर्ण पेन-नाव" ते काही मला माहीती नाही (शीः विनोदाचा किती गरीब आणि सुमार प्रयत्न होता). पण कविता चांगली आहे...वाचा. बाकी सध्या मला बऱ्यापैकी कविता ’भावायला’ लागल्या आहेत...त्यामुले आता अधुनमधून असाच (दुसऱ्याच्या) कवितांचा मारा होत रहाणार...फक्त अशी प्रार्थना करा की मला कविता करायची दुर्बुद्धी व्हायला नको...

----------------------------------------
"झाड"

मी लावलं होतं एक स्थावर मालमत्तेचं झाड
त्याला कर्जाचं पाणी टाकून,
वाढवत होतो हळूहळू.

खूप निघत होता व्याजाचा घाम
चालू होतं हप्त्याचं ठिबक सिंचन
आणी रिकामी होत होती सेविंगची टाकी

वाट बघत होतो अशा एका पावसाची
ज्याने ओसंडून वा

3 comments:

  1. good one... todays reality...mi aatch hyach mandichya rogamule Uk varun part aale....

    ReplyDelete
  2. good one... todays reality...mi aatch hyach mandichya rogamule Uk varun part aale....

    ReplyDelete