ना...ना... - ए. आर. रहमान चे ऒस्कर साठी निवडले गेलेले नवीन गाणे
ए. आर रहमान याचे ’कपल्स रिट्रीट’ या हॊलीवूडच्या चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेले ’ना...ना...’ गाणे ऒस्कर पारितोषिकासाठी नामांकीत झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी रहमानला ऒस्कर नामांकन मिळाले आहे. मागच्या वर्षी ’स्लमडॊग मिलेनिअर’ साठी त्याला २ ऒस्कर मिळाली होती...ह्या वर्षी तशी संधी कमीच वाटते आहे. खूप काही ग्रेट गाणे नाहीये. पण ’जय हो’ तरी कुठे इतके उत्क्रुष्ट होते? त्यापेक्षा रहमानची असंख्य गाणी चांगली आहेत.
ह्या गाण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रहमानचा मुलगा ह्यात पहिल्यांदाच गायला आहे...कुठे आणि कधी? बघा तुम्हाला ओळखता येते का ते :)
आत्ताच अवधूत गुप्ते दिग्दर्शित ’झेंडा’ या चित्रपटाचे शीर्षकगीत मिळाले... चित्रपटाचे प्रोमो YouTube वर आहेच...त्यावरून हा चित्रपट सरळसरळ शिवसेना आणि मनसे यावर आधारीत आहे असे वाटते. त्यामुळे प्रत्यक्ष चित्रपट कसा असेल याची उत्सुकता आहे (अर्थात जर तो प्रदर्शित झाला, किंवा होऊ दिला तर!)
शीर्षक गीत हे सारेगमप फेम ज्ञानेश्वर मेश्राम याने गायले आहे आणि संगीत अर्थातच अवधूत गुप्ते चे आहे...हे गाणे माझ्या ब्लॊग वरुन डाऊनलोड करु शकता