Showing posts with label मनोरंजन/ माध्यमे. Show all posts
Showing posts with label मनोरंजन/ माध्यमे. Show all posts

Sunday, October 17, 2010

एका नवीन नाटकाची जाहिरात...


आजच्या म.टा. मध्ये प्रसिद्ध झालेली एका नवीन नाटकाची जाहिरात...

Sunday, May 2, 2010

राजश्री मराठी डॊट कॊम


राजश्री फिल्म्स या चित्रपट निर्मिती, वितरण करणाऱ्या कंपनीकडे अनेक चित्रपट, मालिका इ. चे वितरणाचे हक्क आहेत. केवळ हिंदीच नाही तर इतर भाषेतल्या कलाक्रुतींचे सुद्धा...


नुकतीच मी त्यांची वेबसाईट - राजश्री मराठी डॊट कॊम पाहिली आणि त्याचीच लिंक इथे शेअर करत आहे...



इथे तुम्हाला अनेक मराठी चित्रपट, मालिका इ. च्या चित्रफिती (संपूर्ण किंवा संक्षिप्त) पाहता येतील - तेदेखील विनामूल्य!


~ कौस्तुभ

Wednesday, February 3, 2010

मधुबाला ची काही दुर्मिळ छायाचित्रे

मधुबाला ची काही दुर्मिळ छायाचित्रे - नक्की कोणत्या वर्षीची आहेत ते माहिती नाही.

माधुरी दीक्षित आणि यांची तुलना, साम्य (ती आणि मधुबाला एका काळात असत्या तर कोण जास्त लोकप्रिय झाले असते ई.) ह्यावर अनेक लेख आणि चर्चा झाल्या आहेत किंवा होत रहातील.

पण माझ्या मते  -
१) अशी चर्चा करता येणे शक्य नाही - कारण काळानुसार कोणाचे करीअर कसे घडले असते याचा तर्क करणे अशक्य आहे
आणि त्याहून महत्वाचे...
२) अशी चर्चा करायची गरजच काय!!?? दोघीही (आणि इतर अनेक!) आपापल्या गुणावगुणांसकट चांगल्याच आहेत. उगाच ही भारी आणि ती ’लय्य भारी’ असल्या बाता कशाला?

असो. आता गप्प बसतो - तुम्ही छायाचित्रे पहा!





~ कौस्तुभ

Sunday, November 29, 2009

सुखांत




आज संजय सूरकर दिग्दर्शित ’सुखांत’ हा इच्छामरण या विषयावरचा मराठी चित्रपट पाहीला...फारच चांगला आणि आशयपूर्ण चित्रपट आहे!


ह्याबद्दल सविस्तर लवकरच...पण शक्य झाल्यास नक्की पहा...चुकवू नका.















~ कौस्तुभ

Saturday, November 14, 2009

वटवट वटवट...

वटवट वटवट...

मी आधी म्हटल्याप्रमाणे पुलंचे वटवट वटवट हा बहुरंगी-बहुढंगी कार्यक्रम माझ्या पॊडकास्ट वर अपलोड केला आहे...









Part2:






Part3:






Part4:






Part5:






Part6:












~ कौस्तुभ

Sunday, November 8, 2009

पु. ल. देशपांडे यांचे दुर्मिळ पेटीवादन

पु. ल. देशपांडे यांचे दुर्मिळ पेटीवादन

आज पुलंचा ९० वा जन्मदिन (८ नोव्हेंबर २००९)

सहज YouTube वर सर्च करत असताना पुलंची पेटीवादनाची एक दुर्मिळ क्लिप मिळाली...










पुलंचा असाच अजून एक कमी प्रचलित कार्यक्रम म्हणजे ’वटवट वटवट’ - ज्यातील बराचसा भाग पुढे ’उरले सुरले’ ह्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे.

अतिशय वेगळ्या ढंगाचा हा कार्यक्रम बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये. माझ्या कडे त्याची Audio क्लिप्स आहेत...ज्या मी लवकरच माझ्य Podcast वर अपलोड करीन.

~ कौस्तुभ

Sunday, June 7, 2009

निशाणी डावा अंगठा


नुकताच मी ’निशाणी डावा अंगठा’ हा चित्रपट पाहिला...सुंदर चित्रपट आहे! बरेच दिवसांनी एक चांगला आणि आशयपूर्ण चित्रपट पाहिल्याचे समधान मिळाले. (याआधी डोंबिवली फास्ट आणि वळू हे चित्रपट मला आवडले होते....आणि चेकमेट हा आणखी एक वेगळा मराठी चित्रपट आठवतोय. तसे मधले काही चर्चित चित्रपट पहायचे राहून गेले आहे. उदा. गाभ्रीचा पाऊस)

बुलढाण्यातल्या रमेश इंगळे-उत्रादकर या प्राथमिक शिक्षकाने ’निशाणी डावा अंगठा’ नावाची एक कादंबरी लिहीली. १९९७ ते २००० या काळात ’प्रौढ साक्षरता अभियान’
हा उपक्रम सरकारने खेडोपाडी राबवला. करोडो रुपये खर्चून केलेले हे अभियान लोकांपर्यंत पोचले - पण ते कसे, यावर नर्मविनोदी आणि उपहासगर्भ पद्धतीने लिहिलेली ही कादंबरी आहे...कागदोपत्री यशस्वी झालेली योजना आणि प्रत्यक्षात तिचा उडालेला बोजवारा ह्यावरच ही कादंबरी बेतलेली आहे. त्यातल्याच निवडक प्रसंगांचे चित्ररुपांतर म्हणजे हा चित्रपट.

अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर ह्या कसलेल्या अभिनेत्यांचा सहजसुंदर अभिनय आणि इतर कलाकारांची तितकीच दमदार साथ - वर बोनस म्हणून संदीप खरे यांची गीते आणि सलील कुलकर्णी यांचे संगीत.

ह्याच्या आसपासच ’झी मराठी’ चा ’गल्लीत गोंधळ...’ रिलीज झाल्या मुळे ह्या चित्रपटाला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळू शकली नाही... पण तरिही ज्यांनी तो पाहिला त्या सर्वांना तो आवडला.

अगदी काहीच उणीवा नाहीत असे नाही - म्हणजे भरत जाधव आनि संजय नार्वेकर या ’स्टार्स’ ना उगाचच ओढून ताणून एक सीन दिला आहे ज्याची काहिही गरज नव्हती...पण असे १-२ किरकोळ मुद्दे सोडले तर चित्रपट चांगला आहे. जरूर पहा.