Wednesday, July 26, 2006

विनोद: पोपट - व्यवस्थापन

एकदा गंपू पोपट विकत घ्यायला पोपटविक्याकडं जातो. तिथं साधारणपणे एकसारखे दिसणारे तीन पोपट असतात.

"या डावीकडच्याची किंमत ५०० रुपये." पोपट विक्या.

"का रे बाबा? इतकी का?" गंपू

"कारण त्याला ना संगणक चालवता येतो"

"आणि या उजवीकडच्याची?"

"१०००!, याला एका पोपटाला जे यायचं ते सारं येतंच, शिवाय याला 'युनिक्स' असलेले संगणकही हाताळता येतात." पोपटविक्या.

आता गंपू तिसऱ्याची किंमत विचारणार हे ओळखून पोपटविक्या आधीच म्हणाला "या मधल्याची किंमत मात्र २५०० रुपये बरं का?"

"असं का? काय काय येतं याला?" अर्थातच गंपू.

"खरं तर मी याला कधीच, काहीही करताना पाहिलं नाही आहे. पण बाकीचे दोघे याला 'साहेब' म्हणतात."

No comments:

Post a Comment