परवा एका मित्राकडे गेलो होतो तेव्हा त्याने ’जोक-बुक’ चा नवीन अंक दाखवला. जोक बुक म्हणजे एका प्रसिद्ध ’विवाह-मंडळाचा’ मासिक अंक. आम्ही त्याला ’जोक-बुक’ म्हणतो.
हसून हसून गडाबडा लोळावे असे ’नमुने’ असतात त्यात. काहींचे तर पान भर फोटो पण असतात, कट्रिना किंवा ह्रितिक ला लाजवतील असे मोडेलिंग करत... (बहुतेक फोटो ’जय बजरंग फोटो स्टुडिओ’ वगैरे ठिकाणी काढलेले असतात. आणि मेक-अप च्या नावाखाली चेहेऱ्याला पावडर फासून चेहेऱ्याचा ’खारा दाणा’ केलेला असतो. काही मुलींनी तर आपल्या ऐवजी आईचा फोटो दिला आहे असेच वाटते..तर काही अगदिच "मिस मांजरी बुद्रुक" टाईप फोटो देतात.
सगळ्यात विनोदी ही प्रोफाईल ची हेडलाईन किंवा पंचलाईन असते. उदा:
संगीतात रमणारी संगीता (म्हणजे स्वत:तच रमणारी???) किंवा
’एकांतात रमणारा जगदीश’ (एकांतातच रमत असेल तर मग एकटाच रहा की??!! )
हे दोन हेडलाईन वाचल्यावर ह्या दोघांचेच का जुळवून टाकू नये असे मला वाटले...म्हणजे ती संगीतात रमणार, आणि हा स्वत:त....कुठून तरी कशात तरी रमले म्हणजे झाले...तेवढीच भांडणे कमी...काय?
प्रोफाईल डिस्क्रिप्शन वाचल्यावर तर याहून चांगला मुलगा किंवा मुलगी ह्या जगात असूच शकत नाही असे वाटते - इतकी मोठी सद्गुणांची यादी असते...सरळ मार्गी, हुशार, चतुर, चाणाक्ष इत्यादी इत्यादी. जर मराठी भाषा सुधारावी असे वाटत असेल तर फक्त ही प्रोफाईल्स वाचावीत...इतकी विशेषणे ठासून भरलेली असतात. आणि त्यातही खूप innovations दाखवयाचा प्रयत्न करतात.
बांधा (म्हनजे ’बांधून ठेवा’ नाही, तर शरीराची ठेवण या अर्थाने) ह्या एकाच चतेगोर्य मध्ये किती वैविध्य असते: क्रुश (म्हणजे हल्लीच्या मराठीत ’size zero’ बरं का), मध्यम, किंचीत स्थूल (म्हणजे हे भयंकर जाड ही असू शकते..), सडसडीत (किंवा शिडशिडीत) , शेलाटी (म्हणजे नक्की कसा हा जरा वादाच मुद्दा आहे) इत्यादी इत्यादी
काही प्रोफाईल मध्ये तर नाही ते डिटेल्स दिलेले होते...म्हणजे खेळाची आवड आहे इथपर्यन्त ठीक आहे, पण प्रूफ म्हणून ’शाळेच्या लंगडी संघात सहभाग’ हे सांगायची काय गरज अहे?
एक प्रोफाईल मध्ये ’मुलाला अध्यात्मिक लेखन करयची आवड आहे’ असे होते. म्हणजे हल्लीच्या काळात अध्यात्मिक वाचन करणारा (किंवा री) सापडणे दुर्मिळ, आणि हा बाबा अध्यात्मिक लेखन करतो!
लोकेशन हा अजून एक महत्वचा मुद्दा. बहुतेक मुलींना स्थळ पुणे किंवा मग थेट USA किन्व UK (तिथे मात्र कुठेही चालेल!) अशी अट असते. मग भले त्या स्वत: यवतमाळ किंवा बुलढाणा मध्ये आयुष्य काढलेल्या असू द्या.
बर माहीती फक्त मुला किंवा मुली बद्दलच देतात असे नाही...तर त्यांचे आई, वडिल, भाऊ, बहीण (काही वेळेस पाळीव कुत्रा, मांजर) इ. सर्वांची माहीती
omg this is a fantastic post....u made my day!!! You are very good at righting funny posts...
ReplyDeleteomg this is a fantastic post....u made my day!!! You are very good at righting funny posts...
ReplyDelete