Saturday, February 7, 2009

सा रे ग म प - लिटिल च्याम्प आणि एक आयडिया









आज ’सा रे ग म प’ ची मेगा-फाईनल...सगळ्या मराठी लोकांचे डोळे त्याच्या निकालाकडे लागले आहेत...सध्या आमच्याकडचे वातावरण ’सा रे ग म प’ मय झाले आहे...सगळे जण संगीतातले दर्दी असल्या सारखे सारेगम ची भाषा वापरतात...फक्त

कार्यक्रमाच्या बाबतीतच असे नाही तर एकुणच...



म्हणजे आई माझ्यावर चिडली की पूर्वी म्हणायची "कौस्तुभ, तुला धपाटा देइन बरं का..." आता म्हणते "कौस्तुभ

तुला ’ध’ देइन बरं का"... त्या अर्थाने मी प्रथमेश लघाटे पेक्षा जास्त ’ध’ मिळवले आहेत!



किंवा मी आचरटासारखं बोलायला लागलो

(किंवा खरं तर नुसते बोलायला लागलो तरी) की  माझा धाकटा भाऊ मला ’ग प रे’ म्हणुन गप्प करतो :(





जसजशी फायनल जवळ येत आहे तसतसे अफवांना ऊत आला आहे...प्रत्येकजण आतली बातमी म्हणून वेगवेगळा "लिटील च्याम्प" (च्याम्प हा आमच्या आजीचा उच्चार आहे आणि तोच बरोबर आहे असे तिचे प्रामाणीक मत आहे!) जिंकणार असे सांगते...कोणी म्हणते अमुक एका कडे ५ लाख, ७ लाख मागितले, कोणी म्हणते एका ’अतिश्रीमंत मराठी उद्योगपतीने’ (असा प्राणी खरच अस्तित्वात असतो का? कारण ’अतिश्रीमंत उद्योगपती’ आणि ’मराठी’ हे विरुद्धार्थी शब्द आहेत!) त्याच्या आवडीचा स्पर्धक जिंकावा म्हणून झी टिव्ही ला पैसे

दिले आहेत.
























अशा अनेक अफवा पसरल्या आहेत. असे असताना मी तरी का गप्प बसावे...म्हणुन मी पण एक अफवा पसरवली - की कोण्या एकाला विजेता घोषित करुन लोकांना नाराज करण्यापेक्षा झी ने सगळ्या बाल स्पर्धकांना विजेते घोषीत केले...

2 comments:

  1. nice post....rumor mongering is the way to go....hope ur fav competitor wins :)

    ReplyDelete
  2. nice post....rumor mongering is the way to go....hope ur fav competitor wins :)

    ReplyDelete