Friday, December 25, 2009

हरकत नाही...संदीप खरे ची कविता

संदीप खरे ची अजून एक ’हळूवार’ कविता...

मला असल्या कविता अजिबात आवडत नाहीत...पण काही जणांना मात्र असल्या ’भावनेनी बरबटलेल्या’ (बरं.. तुमच्या भाषेत ’ओथंबलेल्या’) कविता आवडतात...आणि काहिंना ह्या असल्या कविता हव्या होत्या.

मी म्हणालो मी ईमेल नी पाठवतो...पण माझ्या ब्लॊग वर नाही टाकणार...पण हळू हळू असल्या कवितांची मागणी वाढू लागली, त्यामुळे शेवटी मी ही कविता इथेच पोस्ट करत आहे...पण असे असले तरी मी आधीच सांगितल्याप्रमाणे - ही माझ्या टाईप ची कविता नाही...असो!
--------------------------------------------------------------------------------------------------------------
हरकत नाही...
"अक्षर छान आलंय यात !"
 माझी कविता वाचताना
मान तिरकी करत ती एवढंच म्हणते...

डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर...
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
 कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली माझी कवितांची वही...

हरकत नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!
--संदीप खरे
-------------------------------------------------------
~ कौस्तुभ

4 comments:

  1. sorry, not my cup of tea.

    ReplyDelete
  2. sorry, not my cup of tea.

    ReplyDelete
  3. I mean I tend to arrive at conclusions that the poet would not agree with.for instance, in this case, she was tired, sleepy and his poems are boring?

    ReplyDelete
  4. I mean I tend to arrive at conclusions that the poet would not agree with.for instance, in this case, she was tired, sleepy and his poems are boring?

    ReplyDelete