लाचारी...
शरद पवारांचा आज जन्मदिन...त्यानिमित्तानी पेपरमध्ये आलेल्या पान-पान भर जाहीराती पाहून मला काही दिवसांपूर्वी निवडणूकीच्या वेळचा एक प्रसंग आठवला...
एक कट्टर शिवसैनिक (तिसऱ्या किंवा चौथ्या फळीतला) एका न्यूज चॆनेल वर... ’हिंदूह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे...’ वगैरे वगैरे बोलत होता...म्हणजे त्या चॆनेल वर त्या सूत्रधारानी ’तुमचे मत थोडक्यात मांडा...तुम्हाला मी २ मिनिटांचा वेळ देतो आहे’ असे म्हटल्यावर त्या २ मिनिटांपैकी १ मिनिट सगळ्या पदव्या, उपाध्या आणि नमस्कार चमत्कार आणि आदर मानसन्मान यांच्या विशेषणांमध्ये खर्च केला आणि उरलेल्य १ मिनिटात त्याचा ’मुद्दा’ उरकला...त्याचे ही बरोबरच होते म्हणा...कारण बाकी काही बोलला नाही तरी चालेल, पण आपल्या आदरणीय नेत्याचे एक्जरी विशेषण त्याने वगळले असते तर त्याला त्याची ’मातोश्री’ आठवायची पाळी आली असती!
हा प्रसंग लोकसभा निवडणूकीच्या काळातला...पण नंतर विधानसभा निवडणूका आल्या (ज्यात हा एक ’ईच्छुक उमेदवार’ होता)...आणि ह्यानी त्याची निष्ठा बदलली आणि शरद पवारांच्या पक्षात उडी मारली...नंतर लगेचच तो त्याच चॆनेलवर त्याच कार्यक्रमात तावातावानी भांडताना दिसू लागला...फक्त राष्ट्रवादीच्या बाजूनी. तेव्हा एकदा परत ’२ मिनिटात’ आपला मुद्दा मांडताना त्याची सुरुवात होती ’आमचे आदरणीय नेते क्रुषीमंत्री ना. शरदचंद्रराव जी पवारसाहेब...’ !!!
'शरद पवार' यांचे एकदम 'शरदचंद्रराव जी पवारसाहेब'
अरेरे किती ही लाचारी...
ह्याच लाचारीला राजकारणाच्या संदर्भात ’निष्ठा’ म्हणतात...तर अध्यात्माच्या क्षेत्रात त्याचे भाषांतर ’ह.भ.प. प. पू. सदगुरू (किंवा जगतगुरू!) श्री श्री अमूक तमूक महाराज’ वगैरे होते आणि त्याला ’भक्ती’ म्हणतात.
आम्ही (म्हणजे ’स्वतः’!) त्याला लाचारी म्हणतो.
~ कौस्तुभ
?????? ????????? ???? ??? ????, ?????? ?? ??????.. ???? ????? ???.. ????????? ????? ??..
ReplyDelete??? ???? ????????????? ?????????? ???? ??? ????? ???? ???.??????????? ??????? ???? ??.?????? ???? ?????? ??? ??? ?????????? ???? ???? ??? ???????? ????? ??? ??? ??????? ??????????? ?????.??????? ?? ??? ????? ???? ??????? ????. ?????? ???? ??????? ???? ??????.??? ??? ??? ???? ??????? ??????.????? ??? ???? ????? ??????? ?????? ???????? expose ???????? ????..??????? ??? ?????? ????? ??? ???? ?? ???????? ??????? ?????? ????.

ReplyDelete